Supernatural Psychological Horror Film Vash Level 2: स्वतःवर अजिबात राहत नाही ताबा, एवढा भारी आहे, 'या' सुपरहिट सिनेमाचा सीक्वल; कुठे पाहता येईल?
Supernatural Psychological Horror Film Vash Level 2: 'वश' हा तोच गुजराती चित्रपट आहे, ज्यावर अजय देवगण आणि आर. माधवन यांनी 'शैतान' हा चित्रपट बनवला होता.

Supernatural Psychological Horror Film Vash Level 2: सध्या एका फिल्मची जोरदार चर्चा रंगली आहे. ना ती फिल्म साऊथची (South Film) आहे, ना बॉलिवूडची (Bollywood News). सर्वांची मनं जिंकणारी ही एक गुजराती फिल्म (Gujarati Film) आहे. त्याचा पहिला भाग सुपरहिट झाला होता आणि आता दुसरा भाग आणखी भयानक आहे, जो लोकांना खूप आवडतोय. आम्ही 'वश लेव्हल 2' (Vash: Level 2) बद्दल बोलत आहोत. या वेब सीरिजनं थिएटरमध्ये चांगला व्यवसाय केला आणि आता लवकरच ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे.
'वश' हा तोच गुजराती चित्रपट आहे, ज्यावर अजय देवगण आणि आर. माधवन यांनी 'शैतान' हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपटही चांगली कमाई करण्यात यशस्वी झाला. आता 'वश' सिनेमाचा सिक्वेल आला आहे आणि लोकांनाही तो खूप आवडला आहे. हा एक थ्रिलर चित्रपट आहे.
'वश 2' कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार?
'इंडिया डॉट कॉम'च्या वृत्तानुसार, 'वश लेव्हल 2' ShemarooMe ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाऊ शकतो. दरम्यान, निर्मात्यांनी अद्याप याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. दरम्यान, 'वश' देखील या प्लॅटफॉर्मवर आहे. त्यामुळे असं म्हटलं जातंय की, त्याचा सिक्वेल शेमारूमीवर देखील प्रदर्शित होईल.
'वश लेव्हल 2' बद्दल थोडंस...
'वश लेव्हल 2'चे दिग्दर्शन कृष्णदेव याज्ञिक यांनी केलं आहे. यात हितू कनोडिया, जानकी बोडीवाला आणि हितेन कुमार सारखे कलाकार आहेत. मोनल गज्जर देखील मुख्य भूमिकेत आहे. यावेळीही निर्मात्यांनी जादूटोण्यावर आधारित कथा पुढे नेली आहे.
पहिल्या पार्टपेक्षाही दुसरा पार्ट खतरनाक
'वॅश लेव्हल 2'चं प्रेक्षकांनी तसेच समीक्षकांनी भरभरुन कौतुक केलं आहे. हॉरर थ्रिलरच्या बाबतीत, हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वश'पेक्षाही अधिक दमदार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी 'शैतान'च्या निर्मात्यांचे आभारही मानले आहेत. 'वश'ला ओळख देण्याचं श्रेयही शैतानला जातं, असं त्यांचं मत आहे. 'वश'चा सिक्वेल देखील शैतानमुळेच बनवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























