Sunjay Kapur Death: संजय कपूर यांना तीन दिवसांपूर्वीच लागलेली मृत्यूची चाहुल? लाल रंगाच्या शब्दांतली 'ती' पोस्ट होतेय व्हायरल
Sunjay Kapur Death: करिष्मा कपूरच्या घटस्फोटीत पतीचं निधन झालं आहे. बिझनेस टायकून संजय कपूर यांनी 53व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सध्या त्यांची एक पोस्ट व्हायरल होत असून त्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Sunjay Kapur Death: एकीकडे अहमदाबादच्या एअर इंडियाच्या (Air India) विमान अपघातामुळे (Air India Plane Crash in Ahmedabad) संपूर्ण देश हळहळतोय, तर दुसरीकडे मध्यरात्री करिष्मा कपूरचा (Karisma Kapoor) घटस्फोटीत नवरा बिझनेस टायकून संजय कपूर (Sunjay Kapoor) यांच्या निधनाचं धक्कादायक वृत्त समोर आलं. करिष्मा कपूर आणि संजय कपूर यांनी 13 वर्ष संसार केल्यानंतर घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांची कस्टडी मुलांची आई, करिष्माकडे सोपवण्यात आली. संजय कपूर यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी करिष्मा कपूरला भेटून धीर दिला. अशातच आता सोशल मीडियावर संजय कपूर यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामुळे संजय कपूर यांना त्यांच्या मृत्यूची चाहुल तीन दिवसांपूर्वीच लागली होती, असं बोललं जात आहे.
संजय कपूर यांनी साधारणतः तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलेली. या पोस्टमध्ये त्यांनी आपलं एकंदरीतच आयुष्य, जीवन-मृत्यू यासंदर्भात काही ओळी शेअर केलेल्या. व्हाईट बॅकग्राउंड आणि त्यावर ठळक लाल रंगात या ओळी लिहिलेल्या होत्या. तसेच, ही पोस्ट शेअर करताना संजय कपूर यांनी 'Progress demands bold choices, not perfect conditions.', असं कॅप्शन दिलेलं. त्याचप्रमाणे #MondayMotivation या हॅशटॅगसह संजय कपूर यांनी ती पोस्ट शेअर केलेली.
संजय कपूर यांच्या या पोस्टवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप सकारात्मक होता. ही पोस्ट संजय कपूर यांनी 9 जून रोजी केली होती. दरम्यान, संजयची शेवटची पोस्ट त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी होती, ज्यामध्ये त्यांनी अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या होत्या.
Progress demands bold choices, not perfect conditions. #MondayMotivation pic.twitter.com/vapd8KkOuU
— Sunjay Kapur (@sunjaykapur) June 9, 2025
संजय कपूर यांनी 'त्या' लाल रंगाच्या शब्दांत काय लिहिलेलं?
संजय कपूर यांनी ट्विटरवर 9 जून रोजी एक टेक्स्ट पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी आपल्या वेळेला महत्त्व देण्याबाबत भाष्य केलेलं. त्यांनी लिहिलेलं की, " 'काय होईल जर' हा प्रश्न बाजूला ठेवून, त्यांनी 'का नाही' या सकारात्मक दृष्टिकोनानं जीवन जगण्याबद्दल आणि स्वप्न पूर्ण करण्याबद्दल सांगितलं. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं की, या पृथ्वीवरील तुमचा वेळ मर्यादित आहे. 'काय होईल जर' च्या गुंतागुंतीत अडकण्याऐवजी, 'का नाही' हा विचार करुन पुढे जा.
संजय कपूर यांचा मृत्यू कशामुळे झाला?
संजय कपूर यांचं निधन लंडनमध्ये पोलो खेळताना झालं. 53 वर्षांच्या करिष्मा कपूरच्या घटस्फोटित पतीला हृदय विकाराचा झटका आल्याचं सांगितलं जातंय. पण, त्यांच्या मृत्यूचं आणखी एक खळबळजनक कारण समोर आलं आहे. संजय कपूर पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि त्यांना चावली. त्यानंतर मात्र, त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांना हार्ट अटॅक आला. ते पोलो खेळताना मैदानातच कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























