एक्स्प्लोर

Subhash Ghai on Salman Khan: ..तेव्हा सलमान खानने मला शिवीगाळ अन् मारहाण...; सुभाष घईंनी सांगितला पार्टीतला किस्सा, सलीम खान यांची मध्यस्थी

Subhash Ghai Salman Khan: बॉलिवूड दिग्दर्शक सुभाष घई यांनी सलमान खानसोबत झालेल्या वादाबाबत खुलासा केला.

Subhash Ghai Salman Khan Fight: सुभाष घई (Subhash Ghai). बॉलिवूड दिग्दर्शकांमध्ये (Bollywood Director) असं एक नाव ज्यांनी सिनेइंडस्ट्रीत सुवर्णकाळ गाजवला होता. 80 आणि 90च्या दशकात त्यांनी ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज करुन बॉलिवूडला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं. त्यांच्या सिनेमांना प्रेक्षकवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत होता.  आजही सुभाष घई यांचे चित्रपट आवर्जून पाहिले जातात.   2008 साली प्रदर्शित झालेला सुभाष घई दिग्दर्शित 'युवराज' (Yuvvraaj) या सिनेमाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. 'युवराज' या सिनेमात सुपरस्टार सलमान खानने काम केले होते. त्याची मुख्य भूमिका होती.  तो त्यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करत होता.  दरम्यान, या सिनेमातील काही रंजक किस्से सुभाष घई यांनी अलिकडेच शेअर केले आहेत.

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत, सुभाष घई यांनी सलमान खानसोबतच्या जुन्या वादाबाबत सांगितले.  एकदा या दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता, अशी माहिती सुभाष घई यांनी मुलाखतीतून दिली.  सुभाष घई मुलाखतीत खुलासा करत म्हणाले, या वादानंतर सलीम खान यांनी यात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच सलमान खानला चांगलेच सुनावले. सुभाष घई यांनी मुलाखतीत सांगितले की, 'फिल्म युवराजच्या वेळेस सलमान खानचा  भाऊ माझ्याकडे आला होता. तेव्हा त्याचा भाऊ मला म्हणाला होता की,  तुम्ही सलमानसोबत सिनेमा का नाही तयार करत? तेव्हा मी त्याला म्हणालो की, सलमान खानला माझ्यासोबत काम करण्यात रस आहे का?'.

'कारण याआधी मी कधीच सलमान खानसोबत काम केलं नव्हतं. तेव्हा त्याचा भाऊ म्हणाला की, हां, त्याला तुमच्यासोबत काम करायचं आहे.  यानंतर मी स्टोरी लिहिली. सलमान खानला अशा भूमिकेसाठी कास्ट करायचे होते, जे त्याने यापूर्वीच कधीच साकारले नव्हते, हे चॅलेंज माझ्यासमोर होते. पण फिल्म सुरू होण्यापूर्वीच आमच्यात वाद झाला होता. आमच्यात तेव्हा हाणामारीसुद्धा झाली. त्यानंतर त्यांचे वडील सलीब साहेब, त्याच्यावर रागावले', असं सुभाष घई म्हणाले.

सुभाष घई आणि सलमान खान यांच्यात वाद नेमका कशामुळे झाला? (Subhash Ghai Reveals Salman Khan Once Got Into A Fight)

सुभाष घई यांनी त्या दिवशीचा प्रसंग सांगताना म्हटले की, 'आम्ही एका पार्टीत होतो. सलमान खान हा नशेत होता.  तो काहीतरी चुकीचं बोलत होता. मी त्याला रोखलं.  कदाचित तो माझ्यावर कोणत्यातरी गोष्टीवरुन नाराज असावा.  तेव्हा त्याने मला विचारले की, तुम्ही हे का केले?  मी म्हणालो की, दिग्दर्शक असल्यामुळे तो माझा निर्णय आहे.  यानंतर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.  मी या सर्व गोष्टी करण्यापासून थांबवत होतो'.

'या कारणावरुन आमचं भांडण झालं.  दुसऱ्या दिवशी सकाळी मला सलीम साहेब यांचा फोन आला.  तेव्हा सलीम खान म्हणाले की, सलमान खानने आपल्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत.  ते मला म्हणाले होते की, सलमान खानला मी ओरडलो आहे.  यानंतर त्यांनी सलमान खानला माझ्या घरी माफी मागण्यास पाठवले.  सलमान खानने माफी मागितली.  यानंतर माझं त्याच्याप्रति प्रेम आणि सन्मान भावना वाढत गेली. कारण तो आपल्या वडिलांची खूप इज्जत करतो.  मी तिथेच विषय सोडून दिला. यानंतर आम्ही एकत्र फिल्म केली', असं सुभाष घई म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lagaliya Odh Jeeva Marathi Serial : आता
आता "याड" नाय तर "ओढ" बी लावणार; नवी गोष्ट ‘लागलिया ओढ जिवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
Samantha Ruth Prabhu : समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
समंथा झाली आई; पतीसोबत शेअर केली बाळाची पहिली झलक, मुलाचं बारसंही केलं, नावाचा अर्थ काय?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Keerthy Suresh : अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
अभिनेत्री कीर्ती सुरेशला दिग्दर्शकाने सर्वांदेखत नको तिथे स्पर्श केल्याचा व्हिडीओ व्हायरल, पण अभिनेत्रीने ट्रोलर्सना सुनावलं; म्हणाली, 'आमचं नातं...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget