एक्स्प्लोर

KBC 18: खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार

KBC 18 Contestant Bhushan Thakre: महाराष्ट्राचा लेक अर्थात भूषण ठाकरेंनी केबीसीमधून एक कोटी जिंकले.

Kaun Banega Crorepati 18: 'कोन बनेगा करोडपती'च्या 18 व्या (Kaun Banega Crorepati) सिझनला पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. या शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला असं वाटतं की, त्याने करोडपती व्हावं. ज्ञानाच्या या खेळात बरेच जण आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतात. अशातच जळगावचे (Jalgaon) भूषण ठाकरे (Bhushan Thackeray) यांनी बाजी मारली. 7 कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत भूषण ठाकरे पोहोचले होते. सोनी टिव्हीने या शोचा खास प्रोमो सोशल मीडियात शेअर केला होता. 'कोन बनेगा करोडपती'च्या 18  व्या सिझनने आपला पहिला करोडपती स्पर्धक मिळवला आहे.  महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा मुलगा या टप्प्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

'कोन बनेगा करोडपती'च्या 18 व्या सिझनला पहिला करोडपती स्पर्धक मिळाला (KBC Jalgaons Bhushan Thakre Reaches Rs 1 Crore)

जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून भूषण ठाकरेंची ओळख आहे. भूषण ठाकरे यांची स्वप्ने खूप मोठी आहेत. मात्र, परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकले नाही. खिशामध्ये 24 रुपये घेऊन स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षणासाठी भूषण ठाकरे घराबाहेर पडले.  त्यांचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षक आणि भावाच्या मदतीने त्यांनी शिक्षण घेतले.  सुरुवातीपासून 'कोन बनेगा करोडपती' या शोमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न होतं. 

त्यांनी भरपूर प्रयत्न केले. गेल्या 10 वर्षांत 'कोन बनेगा करोडपती' या  शोमध्ये ते 10 वेळा सिलेक्ट झाले होते. पण काही कारणामुळे बाद देखील झाले.  पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांचे प्रयत्न सुरूच होते.  जिद्द आणि चिकाटी कायम ठेवल्यामुळे 2026 साली त्यांचं 'कोन बनेगा करोडपती' या शोमध्ये सिलेक्शन झालं. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसून त्यांनी प्रत्येक प्रश्नांचा टप्पा पार केला. तसेच 1 कोटी रुपयांच्या टप्प्यापर्यंत पोहोचले.

भूषण ठाकरे यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. आता तब्बल दीड वर्षानंतर भूषण ठाकरे हे आपल्या आई-वडिलांना भेटणार आहेत. एवढेच नाही तर, शिक्षणासाठी विकलेले आईचे दागिने घेणार आहेत. आईला पुन्हा दागिने देणार असल्याचं भूषण ठाकरे यांनी सांगितलं. 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर भूषण ठाकरे म्हणाले की, 'कितीही मोठे स्वप्न असली तरी स्वप्न पहा, स्वप्न खरी ठरतात', असं मत त्यांनी व्यक्त केलं.  तसेच, केबीसीच्या माध्यमातून मिळालेले एक कोटी, ही माझ्या परिवाराची 25 वर्षांची कमाई आहे, अशी भावना एबीपी माझाशी बोलताना भूषण ठाकरे यांनी व्यक्त केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

 नाश्ता केला अन् हॉटेलमध्ये आला हृदयविकाराचा झटका; शूटिंगदरम्यान अभिनेता सोहेल खानची प्राणज्योत मालवली, नेमकं काय घडलं?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sohel Khan Dies: नाश्ता केला अन् हॉटेलमध्ये आला हृदयविकाराचा झटका; शूटिंगदरम्यान अभिनेता सोहेल खानची प्राणज्योत मालवली, नेमकं काय घडलं?
नाश्ता केला अन् हॉटेलमध्ये आला हृदयविकाराचा झटका; शूटिंगदरम्यान अभिनेता सोहेल खानची प्राणज्योत मालवली, नेमकं काय घडलं?
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Riteish Deshmukh Genelia: भरहॉटेलमध्ये रितेशच्या मांडीवर जेनेलिया बसली; नवऱ्याला प्रेमाने भरवला घास, नेटकरी म्हणाले, 'सोनिया अन् राजीव गांधी'
भरहॉटेलमध्ये रितेशच्या मांडीवर जेनेलिया बसली; नवऱ्याला प्रेमाने भरवला घास, नेटकरी म्हणाले, 'सोनिया अन् राजीव गांधी'
Sayaji Shinde: 'एकही झाड न तोडता प्रकल्प राबवा'; सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक, 3 डिसेंबरला मोर्चा काढणार
'एकही झाड न तोडता प्रकल्प राबवा'; सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे आक्रमक, 3 डिसेंबरला मोर्चा काढणार
Advertisement

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunil Tatkare on Konkan new district: कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Embed widget