एक्स्प्लोर

Star Pravah Prajakta Gaikwad New Serial Pathrakhin: दिग्गज अभिनेत्रीसोबतच्या भांडणामुळे चर्चेत आली, आता 5 वर्षांनी टीव्हीवर कमबॅक; दिग्गज दिग्दर्शकाची लेकही डेब्यू करणार, प्रोमो पाहिलात?

Star Pravah Prajakta Gaikwad New Serial Pathrakhin: स्टार प्रवाहवर एक नवी मालिका सुरू होतेय, जिची जोरदार चर्चा रंगली आहे. यामध्ये दोन प्रसिद्धी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Star Pravah Prajakta Gaikwad New Serial Pathrakhin: सध्या टीव्हीवर (Television News) आता अनेक नव्या मालिका येऊ घातल्यात, तर अनेक जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. नव्या मालिकांमध्ये नवे चेहरे दिसताय, तर काही जुने चेहरे पुन्हा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहेत. अशातच आता स्टार प्रवाहवर एक नवी मालिका (New TV Serial) सुरू होते, जिची जोरदार चर्चा रंगली आहे. या मालिकेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या दोन बहि‍णींची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यामध्ये दोन प्रसिद्धी अभिनेत्री (Famous Actress) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघींपैकी एक टेलिव्हिजन विश्वातला प्रसिद्ध चेहरा आहे, जो 5 वर्षांनी टीव्हीवर कमबॅक करतोय. तर, एक प्रसिद्धी अभिनेत्री आहे, जी सिनेमांमधून टेलिव्हिजनवर पदार्पण करतेय. 

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर लवकरच 'पाठराखीण' (Pathrakhin New Serial) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची. बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुख-दुःखात नेहमी सोबत असणाऱ्या या बहिणींचं आयुष्य मात्र एका अनपेक्षित वळणावर बदलतं. परिस्थिती, समाज आणि नियती यांच्या कसोटीवर त्यांचं नातं कसं टिकून रहातं, याची उत्कंठावर्धक मांडणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तब्बल 5 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तर सिनेमांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडलेली गुणी अभिनेत्री गौरी इंगवले पाठराखीणच्या निमित्तानं मालिका विश्वात दमदार एण्ट्री घेणार आहे. 

'पाठराखीण' मालिकेचा प्रोमो पाहिलात?

प्राजक्ता गायकवाड हिच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तिच्या मुख्य भूमिकेतील 'पाठराखीण' या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या मालिकेत प्राजक्तासोबत गौरी इंगवले देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ही मालिका 1 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असली, तरी स्टार प्रवाहनं अद्याप कोणत्या वेळेत ही मालिका पाहायला मिळणार, हे जाहीर केलेलं नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

'पाठराखीण' मालिकेची निर्मिती बांदेकर कुटुंबियांच्या 'सोहम प्रोडक्शन'कडून केली जात आहे. कलाकारांच्या फळीमध्ये मिताली जगताप या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्या मालिकेत प्राजक्ताच्या मामीची, तर गौरीच्या आईची भूमिका साकारणार आहेत. तर, रमेश वाणी (मामा – चंद्रशेखर वैद्य) हे प्राजक्ताच्या मामांच्या भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी ते ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत झळकले होते. याशिवाय दीप्ती लेले आणि शकुंतला नरे यांचीदेखील झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Veen Doghatli Hi Tutena Actress Poorva Gokhale: समर-स्वानंदीच्या आयुष्यात 'ती' येणार, 9 वर्षांनी प्रसिद्ध नायिकेचं झी मराठीवर कमबॅक, ओळखलं का कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
OTT Webseries: Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget