एक्स्प्लोर

SSR Case : रिया चक्रवर्तीला NCB नं बजावला समन्स, कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहेआज एनसीबीच्या टीमनं सकाळी रियाच्या घरी जाऊन रियाला समन्स बजावला आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहे. परवा सकाळीच एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी धाड टाकत घराची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. रात्री जवळपास 10 वाजता शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आज एनसीबीच्या टीमनं सकाळी रियाच्या घरी जाऊन रियाला समन्स बजावला आहे. आज रिया चक्रवर्तीला सकाळी 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी NCB कार्यालयात जावं लागणार आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये जेव्हा ड्रग्सचा अॅंगल समोर आला होता तेव्हा त्याचे धागे रिया चक्रवर्तीशी कुठेतरी जोडलेले आहेत का? असा सवाल उपस्थित केला गेला आणि आता याच प्रकरणात रिया चक्रवर्ती वर अटक होण्याची नामुष्की आली आहे.

मी अडकले तर तुम्हाला सगळ्यांना अडकवेन, रियाची आपल्या गॉड फादरला धमकी

आधी रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर आणि रिया चक्रवर्ती जवळचा मित्रा सॅम्युअल मिरांडा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक करून 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कस्टडी देण्यात आली आहे. NCBच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या प्रकरणांमध्ये आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार यांचा संबंध समोर आला आहे. त्यामुळे रियाला चौकशीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून समन्स बजावण्यात आला आहे.

ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास केला जात होता. याच तपासादरम्यान रिया आणि शौविकच्या मोबाईलची तपासणी केल्यावर ईडीला ड्रग्स संदर्भातले चॅट सापडले जे डिलीट करण्यात आले होते आणि हे चॅट सापडल्यानंतर या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन्ट्री झाली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो डेप्युटी डायरेक्टर जैन यांनी आत्तापर्यंतच्या नार्कोटिक्स ब्युरोच्या कारवाईवर बोलत या प्रकरणांमध्ये अजून तपास करून रियाला आतापर्यंत चौकशीसाठी समन्स बजावले नाही आहे तसेच लवकरात लवकर तिला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे, असं काल सांगितलं होतं.

SSR Case | ड्रग्जप्रकरणी शौविक आणि मिरांडाला अटक, रिया ड्रग्ज मागवत असल्याची कबुली

रिया चक्रवर्तीवर ड्रग्सचं सेवन करणे, ड्रग्सची वाहतूक करणे आणि शौविकच्या माध्यमातून ड्रग्स मागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. या प्रकरणामध्ये आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे. यात अप्पा लखानी आणि करण अरोडा यांना जामीनही मिळाला आहे. तर जैद विलात्रा आणि बासित परिहार, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा यांना 9 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

यात रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली तर ही आतापर्यंतची या प्रकरणांमध्ये सगळ्यात मोठी अटक असणार आहे. तसंच यात बॉलिवूडमधील अजून काही बड्या व्यक्तींची नावं समोर येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget