SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक
SS Rajamouli Speech : नुकताच RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
![SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक ss rajamouli says mera bharat mahan at 28th critics choice awards marathi news SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/5bbda413e2560702477258eb333c23291673881249416358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SS Rajamouli Speech : सध्या सगळीकडे आरआरआर (RRR) चित्रपटाची चर्चा सुरु आहे. राजामौली (SS Rajamouli) हे साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. आरआरआर चित्रपटाच्या यशानंतर सध्या संपूर्ण देशातूनच भरभरून प्रेम मिळत आहे. नुकताच या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. या दरम्यान एस.एस.राजामौली यांनी मंचावर जे भाषण केलं त्याने संपूर्ण देशाचं मन जिंकलं आहे.
राजामौली यांना पुरस्कार
आज टीम 'RRR' ने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये एसएस राजामौली लॉस एंजेलिसमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांचे विजयी भाषण देताना दिसू शकतात. व्हिडीओ शेअर करताना, टीमने लिहिले, '#CritcsChoiceawards मध्ये RRR सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट जिंकला, माझा भारत महान #RRRMovie.
पाहा व्हिडीओ :
RRR won the BEST FOREIGN LANGUAGE FILM award at the #CritcsChoiceawards 🙏🏻🙏🏻🙏🏻
— RRR Movie (@RRRMovie) January 16, 2023
Here’s @ssrajamouli acceptance speech!!
MERA BHARATH MAHAAN 🇮🇳 #RRRMovie pic.twitter.com/dzTEkAaKeD
सन्मान स्वीकारताना, राजामौली व्हिडीओमध्ये म्हणाले, "माझ्या आयुष्यातील सर्व महिलांपैकी, माझी आई राजनंदानी, तिला असे वाटले की, शालेय शिक्षण ओव्हररेट केले गेले आणि मला कॉमिक्स आणि कथा पुस्तके वाचण्यास प्रोत्साहित केले आणि तिने माझ्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले.
मेरा भारत महान - राजामौली
पुरस्कार सोहळ्यात 'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलींबद्दलही बोलले. ते म्हणाले, 'माझी पत्नी रमा, ती माझ्या चित्रपटांची कॉस्च्युम डिझायनर आहे पण त्याहीपेक्षा ती माझ्या आयुष्याची डिझायनर आहे. ती नसती तर आज मी इथे नसतो.
RRR ची कथा
साइन आउट करण्यापूर्वी दिग्दर्शक म्हणाला, 'माझी मातृभूमी, भारत, माझा भारत महान. जय हिंद. धन्यवाद.' 'RRR' ने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट गाण्याचे समीक्षक चॉईस अवॉर्ड जिंकले. RRR ही दोन तेलुगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित एक काल्पनिक कथा आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाने जगभरात 1,200 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रिया सरन यांनी काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)