Sreenanda Shankar Announces Divorce: 'आम्ही वेगळे झालोत...', सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं मोडला 16 वर्षांचा सुखी संसार, घटस्फोटानंतर इमोशनल पोस्ट
Sreenanda Shankar Announces Divorce: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीनंदानं तब्बल 16 वर्षांच्या सुखी संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Sreenanda Shankar Announces Divorce: मनोरंजन विश्वात (Entertainment News) कोणता ना कोणता ट्रेंड येत असतो आणि एकापाठोपाठ सगळेच ट्रेंड फॉलो करतात. पण, आता सध्या मनोंजनसृष्टीत घटस्फोट (Divorce) घेण्याचा ट्रेंड आलाय की, काय? असा प्रश्न निर्माण होत आहेत. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी जोडपी आपल्या सुखी संसारातून काडीमोड घेत आहेत. अशातच आता एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीनंही घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे. आपल्या इन्टाग्राम अकाउंटवरु पोस्टकरुन अभिनेत्रीनं तिच्या नवऱ्यापासू विभक्त झाल्याचं जाहीर केलं आहे.
साऊथ सिनेसृष्टीती सुप्रसिद्ध कोरिओग्राफर तनुश्री शंकर (choreographer Tanushree Shankar) यांची मुलगी श्रीनंदा शंकर (Sreenanda Shankar)) हिनं तिचा पती गेव्ह सतारवालापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तब्बल 16 वर्षांच्या सुखी संसारानंतर या जोडप्यानं आपसी सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री श्रीनंदानं इन्स्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली.
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीनंदाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर 21 डिसेंबर 2025 रोजी एक पोस्ट केली होती. त्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिनं म्हटलेलं की, "गेल्या काही दिवसांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि वैवाहिक संबंधांबद्दल ज्या अफवा पसरत होत्या, त्या दुर्दैवानं खऱ्या आहेत. आम्ही काही काळापूर्वीच वेगळे झालो होतो, पण, हे सार्वजनिक करण्यापूर्वी आम्हाला स्वतःला थोडा वेळ हवा होता..."
अभिनेत्रीनं सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये कुठेही वेगळं होण्याचं कारण नमूद केलेलं नव्हतं. पण, आमही दोघांनी हा निर्णय आपसी सहमतीनं घेतल्याचं अभिनेत्रीनं स्पष्ट केलं.
View this post on Instagram
घटस्फोटाची अधिकृत घोषणा केल्यानंतर श्रीनंदा शंकर भावूक
अभिनेत्रीनं तिच्या घटस्फोटाची बातमी शेअर करताना लिहिलंय की, "मी कंटेंट तयार करत राहीन. काहीजण आमचे एकत्र व्हिडीओ मिस करतील, पण कृपया लक्षात ठेवा की, ऑनलाइन घालवलेले छोटे-छोटे क्षण कधीही लग्नाचं खरं चित्र दाखवत नाहीत. तुमच्या सततच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद... मला आता त्याची पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे..."
सतारावाला-श्रीनंदा शंकर यांची लव्ह स्टोरी
गेव्ह सतारावाला-श्रीनंदा शंकर दोघेही सोशल मीडियाद्वारे भेटले आणि आठ महिने एकमेकांसोबत त्यांनी वेळ घालवला. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तब्बल पाच वर्ष लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 2009 मध्ये लग्न केलं. दरम्यान, 16 वर्ष एकत्र राहिल्यानंतर आता दोघांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोण आहे श्रीनंदा शंकर?
श्रीनंदा शंकर एक अभिनेत्री, मॉडेल, नृत्यांगना आणि कंटेंट क्रिएटर आहे. जिनं मेकओव्हर मॅडनेस, इट्स अबाउट व्हाट सूट यू हे स्वतःचे मेकअप प्लॅटफॉर्म देखील लाँच केले आहे. श्रीनंदा शंकर, तनुश्री शंकर आणि आनंद शंकर यांची मुलगी आहे. ती नृत्यांगना आणि कोरिओग्राफर उदय शंकर आणि त्यांची पत्नी अमला शंकर यांची नात आहे, तर रवि शंकर तिच्या आजोबांचे भाऊ आहेत. श्रीनंदानं तिच्या अभिनय आणि नृत्य कारकिर्दीला लहान वयातच सुरुवात केली. आजवर तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























