एक्स्प्लोर

एकापाठोपाठ एक हत्या, घनदाट जंगल अन् एक जुनी गुहा, मूळची तमिळ पण हिंदीत डब केलेली 'ही' सीरिज डोक्याचा भुगा करते; पाहिलीय का?

Must Watch Spine Chilling Tamil Original Series: तमिळ चित्रपटसृष्टीतील एका हॉरर क्राईम थ्रिलर सीरिज, जी तुम्ही पाहायलाच हवी. या सीरिजचा क्लायमॅक्स म्हणजे, तुम्ही कितीही डोकं लावलं, कितीही विचार केला, तरीसुद्धा शेवट काय होणार? याचा साधा अंदाजही तुम्ही लावू शकणार नाही.

Spine Chilling Tamil Original Series: जर तुम्हाला हॉरर चित्रपट (Horror Movies) आणि सीरिज (Horror Web Series) पाहायला आवडत असतील, आणि तुमचा असा समज असेल की, भारतात चांगले हॉरर चित्रपट बनत नाहीत, तर तुमचा हा गैरसमज असेल. अलिकडेच, 'स्त्री' (Stree), 'मुंज्या' (Munjya) आणि 'भेडिया' सारख्या हॉरर कॉमेडी चित्रपटांनी (Horror Comedy Movies) अनेकांचे समज चुकीचे ठरवले आहेत. फक्त बॉलिवूडचं (Bollywood) नाहीतर, साऊथमध्येही (South Movie) असे अनेक हॉरर थ्रिलर चित्रपट बनवले गेलेत, ज्यांचे ट्विस्ट आणि क्लायमॅक्स प्रेक्षकांना थक्क करतात. 2024 मध्ये, तमिळ भाषेतील अशीच एक हॉरर थ्रिलर सीरिज समोर आली, जिनं प्रेक्षकांना अगदी भंडावून सोडलं. या सीरिजमध्ये, सतत होणारे खून, जंगलातील शतकानुशतकांपूर्वीटी गुहा आणि काही वेळानं समोर येणारं सत्य अंगावर अगदी शहारे आणतं.

या वेब सीरिजचं नाव आहे, 'इंस्पेक्टर ऋषि' (Inspector Rishi), ही वेब सीरिज 2024 मध्ये प्राईम व्हिडीओवर रिलीज करण्यात आली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तमिळ सिनेमातली सर्वाधिक पाहिली गेलेली ओरिजनल वेब सीरिज होती. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, ही सीरिज हिंदीमध्येही उपलब्ध आहे. 

'इंस्पेक्टर ऋषि'ची स्टार कास्ट 

'इंस्पेक्टर ऋषि' हा एक हॉरर-क्राईम ड्रामा आहे, ज्यामध्ये नवीन चंद्रने इंस्पेक्टर ऋषिची भूमिका साकारली आहे. याव्यतिरिक्त सीरिजमध्ये सुनैना, कन्ना रवि, मालिनी जीवरत्नम, कुमारावेल आणि मीषा घोषालसह इतरही अनेक कलाकार आहेत. ही सीरिज तमिळ भाषेक करण्यात आली होती आणि त्यानंतर हिंदीमध्ये डब करण्यात आली. 

'इंस्पेक्टर ऋषी' ची कहाणी

'इंस्पेक्टर ऋषी' या वेब सीरिजची कथा एका गावातील आहे, जे दऱ्या-खोऱ्यांमध्ये वसलेलं आहे. गावाजवळच्या जंगलात एकामागून एक खून होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गावातील एका व्यक्तीने या हत्या होताना पाहिलेल्या असतात. जेव्हा पोलीस त्याची चौकशी करतात, तेव्हा तो फक्त एकच नाव घेतो, ते म्हणजे, वनराची. तो म्हणतो की, हे खून वनराची करत आहे. वनराची ही जंगलाची राणी होती, जी जंगलाचं रक्षण करत असे. पण आता ती भूत बनली आहे आणि जंगलात येणाऱ्या कोणालाही जीवे मारते. आदिवासी समुदायाचे लोक पूर्वी वनराचीची पूजा करायचे.

एक मृतदेह आणि त्याच्याभोवती असंख्य किडे अन् अलौकिक शक्ती 

पण इन्स्पेक्टर ऋषी याला ते मान्य नाही. जेव्हा तो त्याच्या मित्रांसह या गावात पोहोचतो, तेव्हा तो तिथे सतत होत असलेल्या खूनांचा तपास करू लागतो. त्याला असं वाटतं की, कोणीतरी व्यक्ती या हत्या करत आहे. पण या प्रवासादरम्यान, इन्स्पेक्टर ऋषी काही अलौकिक शक्तींना भेटतो, ज्यामुळे तो स्तब्ध होतो. जंगलात त्याला काही कीटक आढळतात, जे एका माणसाला मारतात आणि त्याच्या मृतदेहाभोवती जाळं विणायला सुरुवात करतात. हळूहळू, संपूर्ण गावात वनराचीची भीती पसरते. सीरिजच्या शेवटी, इन्स्पेक्टर ऋषी एका भयानक सत्याला सामोरं जातो, जे त्याला हादरवून टाकते.

कुठे पाहु शकता ही सीरिज? 

सत्य काय आहे? गावातील लोकांना कोण मारत असतं? यासाठी 'इंस्पेक्टर ऋषि' ही वेब सीरिज तुम्हाला पाहावी लागेल. प्राईम व्हिडीओवर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता. प्राईम व्हिडीओवर हिंदी व्यतिरिक्त, ही वेब सीरिज तमिळ, तेलगू आणि इतर भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

120 मिनिटांची सस्पेन्स-थ्रिलर फिल्म, ज्यात तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ होतायत लीक; पटकथा 'अपरिचित', 'दृश्यम'लाही मागे टाकते

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget