एक्स्प्लोर

Yashika Anand : अभिनेत्री याशिका आनंद अपघातात गंभीर जखमी, मैत्रिणीचा जागीच मृत्यू 

Yashika Anand News : अभिनेत्री याशिका आनंद महाबलीपुरममध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात तिच्यासोबत असलेल्या एका मैत्रिणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

Yashika Anand News : अभिनेत्री आणि तामिळ बिग बॉसमधील स्पर्धक असलेली याशिका आनंद (Yashika Anand) महाबलीपुरममध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. (South Indian actor Yashika Aanand injured in accident, is critical, friend dies )कार अपघातात तिच्यासोबत असलेल्या एका मैत्रिणीचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिका आपल्या मित्रांसह ट्रीपला निघाली होती. त्यांची कार रस्त्यामधील दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर रस्त्याखाली खड्ड्यात जाऊन पडली. या याशिकाची मैत्रिण वल्लीचेट्टी भवानी हिचा जागीच मृत्यू झाला तर याशिका गंभीर जखमी झाली आहे.  

पोलिसांच्या माहितीनुसार 'धुरुवंगल पथिनारु' फेम याशिका आनंदचा 25 जुलै रोजी रात्री एक वाजता अपघात झाला. या कारमध्ये याशिकासह चौघेजण होते. कार खड्ड्यात पडल्यानंतर तिथून जाणाऱ्या लोकांनी कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. तिघेही जखमी अवस्थेत होते. यातील याशिकासह आणखी दोघांना तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले मात्र तिची मैत्रिण भवानी कारमध्येच अडकली होती. तिला वाचवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली. काही वेळांनी तिला बाहेर काढले मात्र तिचा आधीच मृत्यू झाला होता.  

चारही जण दारूच्या नशेत, पोलिसांना संशय 

अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच भवानीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांना चारही जण दारूच्या नशेत असल्याचा संशय आहे. मात्र गुन्हा नोंद करण्यासाठी डॉक्टरांच्या रिपोर्टची पोलिस वाट पाहत असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर जखमी झालेल्‍या यशिकाला हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. कार कोण चालवत होते आणि चालकाने मद्‍यपान केले होते का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

कोण आहे याशिका आनंद

याशिका आनंद ही तामिळ बिग बॉसमुळे चांगलीच प्रसिद्ध झाली होती. याशिका ही तामिळनाडूमधील प्रसिद्‍ध मॉडेल आहे. अनेक चित्रपटांमध्‍ये तिने सहायक अभिनेत्रीच्‍या भूमिका साकारल्‍या आहेत. यामध्‍ये कवलई वेंदम, नोटा आणि ध्रुवांगल पथीनारु या चित्रपटांचा समावेश आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget