पहिल्याच सिनेमासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने घटवलं होतं 30 किलो वजन
Sonakshi Sinha : पहिल्याच सिनेमासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने घटवलं होतं 30 किलो वजन

Sonakshi Sinha :बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आता वयाची 38 वर्षे पूर्ण करणार आहे. सोनाक्षीच्या (Sonakshi Sinha) वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्या फिटनेसबाबत जाणून घेणार आहोत. कारण पहिल्याच सिनेमासाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तब्बल 30 किलो वजन घटवलं होतं. सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) 2 जून रोजी 38 वर्षांची होणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज देखील अतिशय फिट आणि ग्लॅमरस दिसते. पण जेव्हा ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होती, तेव्हा तिचं वजन खूप जास्त होतं. त्यामुळे डेब्यू करण्यापूर्वी तिने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. सोनाक्षी सिन्हाने तब्बल 30 किलो वजन कमी करून आकर्षक शरीरयष्टी (कर्वी फिगर) निर्माण केली. त्यानंतर त्यांनी सलमान खानसोबत 'दबंग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. जर तुम्हालाही सोनाक्षीप्रमाणे स्लिम व्हायचे असेल, तर आम्ही तुम्हाला त्यांच्या वर्कआउटचे रहस्य सांगणार आहोत.
View this post on Instagram
30 किलो वजन कमी करण्यासाठी सोनाक्षीने अनेक दिवस दिवसरात्र कठोर परिश्रम केले होते. त्यांनी यासाठी आहाराचे प्रमाण कमी केले आणि भरपूर लिक्विड्सचा (द्रवपदार्थांचा) वापर केला. यामुळे त्यांचे शरीर नेहमी हायड्रेटेड राहायचे. डाएटकडे लक्ष देण्याबरोबरच सोनाक्षीने योगा आणि स्पिनिंग (सायकल वर्कआउट) आपल्या वर्कआउटमध्ये सामाविष्ट केले होते. यामुळे त्यांचे वजन वेगाने कमी झाले.
त्या काळात सोनाक्षी आपला दिवस हाय प्रोटीन आणि लो कार्ब्स डाएटने सुरू करत होती.
सोनाक्षी तिच्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करत होती. त्याचबरोबर दर दोन तासांनी त्या छोटे-छोटे आहार घेत असत. यामुळे तिला ऊर्जा मिळायची. हा वजन कमी करण्याचा एक उत्तम मार्ग मानला जातो. वेट लॉस जर्नी दरम्यान सोनाक्षी कार्डिओ आणि ब्रिस्क वॉकिंग नियमित करायची. तसेच वर्कआउट करताना ती नृत्यालाही भरपूर प्राधान्य देत असे. यामुळे तिला आनंद मिळायचा आणि वजनही कमी व्हायचे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाले तर सोनाक्षी सिन्हा शेवटची ‘काकुड़ा’ या चित्रपटात दिसली होती. त्यात तिच्यासोबत रितेश देशमुख आणि साकिब सलीम होते. आता त्या लवकरच ‘निकिता रॉय’ या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाक्षीच्या भावाने – कुश सिन्हा यांनी केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अभिनेत्री लारा दत्तावर दु:खाचा डोंगर कोसळला, हवाई दलात कमांडर असलेल्या वडिलांचं निधन























