'ए लxxx व्हिडिओ बंद...' सलमान खानचा भाऊ विना हेल्मेट चालवत होता बाइक; VIDEO शुट करताच केली शिवीगाळ
Sohail Khan Breaks Traffic Rules: सोहेल खानचा हेल्मेट न घालता बाईक चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. नेटकऱ्यांचा व्हिडिओवर संताप.

Sohail Khan Breaks Traffic Rules: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman khan) तीन भाऊ. तिन्ही भावांनी आतापर्यंत विविध चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सलमान, अरबाज आणि सोहेल. हे तिन्ही भाऊ सोशल मीडियात प्रचंड चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत असतात. दरम्यान, सलमान खानचा भाऊ सोहेल खान एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तो दुचाकी (बाईक) चालवत असल्याचं दिसत आहे. बाईक चालवत असताना त्याने हेल्मेट घातले नव्हते. त्याने सर्रास नियमांचे उल्लंघन केले असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट होते. यावेळी एक चारचाकी येते. या गाडीतील व्यक्ती त्याचा व्हिडिओ शूट करत असते. हे पाहून सोहेलचा राग अनावर होतो. तो चारचाकीतील व्यक्तीला उपशब्दांचा वापर करतो. सोहेलने व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ केली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सोहेल खानचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच त्यावर तीव्र टीका करण्यात आली. नेटकऱ्यांनी केवळ त्याच्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. तर, सार्वजनिक व्यक्ती म्हणून त्याचे वर्तन बेजबाबदार असल्याची टिकाही केली. व्हिडिओ व्हायरल होताच सोहेल खानने जाहीरपणे सोशल मीडियावर माफी मागितली. त्यानं आपली चूक मान्य केली, तसेच म्हटले की, नियम मोडणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. त्याने असेही स्पष्ट केले की, त्याचा कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता.
सोहेलने स्पष्ट केले की, त्याला क्लॉस्ट्रोफोबियाचा त्रास आहे. त्याला बऱ्याचदा गुदमरल्यासारखे होते. यामुळे त्याला कधीकधी हेल्मेट घालणे कठीण होते. त्याने पोस्टमध्ये म्हटलं की, "मी सर्वांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करतो. मी स्वत: कधी कधी हेल्मेट घालू शकत नाही. कारण मला क्लॉस्ट्रोफोबियाचा त्रास आहे. मला हेल्मेटमध्ये गुदमरल्यासारखे वाटते", असं सोहेल म्हणाला.
सोहेल खानने असेही सांगितले की, लहानपणापासून बाइक चालवणे हा त्याचा छंद आहे. त्यानं आधी सायकल शिकली. नंतर बाइक चालवणे हा त्याच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनला. तो म्हणाला की, "मी सहसा रात्रीच्या वेळेस गाडी चालवतो. खूप स्लो स्पीडमध्ये गाडी चालवतो". सोहेल खानने यावेळी आश्वासन दिले की तो लवकरच या समस्येवर काम करेल. सायकल असो किंवा दुचाकी, नेहमी हेल्मेट घालेन, असं तो म्हणाला. त्याने यावेळी वाहतूक पोलिसांची देखील माफी मागितली. भविष्यात कधीही नियमांचे उल्लंघन करणार नसल्याचं त्याने सांगितलं. सध्या सोहेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला.
























