Marathi actress on Bold Scenes : 'मला इंटिमेट सीन्स करताना अजिबात लाज वाटत नाही', मराठी अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य
Marathi actress on Bold Scenes : मराठी अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इंटिमेट सीन्सविषयी भाष्य केलं आहे.
Marathi actress on Bold Scenes : कोणत्याही चित्रपटात बोल्ड सीन्स केल्याबद्दल अनेकदा अभिनेत्रींना ट्रोल केलं जातं. मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत त्यांच्या कामाच्या कक्षा रुंदावत असे अनेक सीन्स केले आहेत. त्यासाठी त्यांचं अनेकांनी कौतुकही केलं पण त्याचबरोबर त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं. पण वेळोवेळी या अभिनेत्रींनी त्यावर भाष्य करंत त्यांच परखड मतंही दिलं आहे. नुकतच एका अभिनेत्रीने (Marathi Actress) या बोल्ड सीन्सविषयी भाष्य करत बेधडक वक्तव्य केलं आहे.
अभिनेत्री प्रिया बापट, सई ताम्हणकर, राधिका आपटे यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत त्यांच्या कामाचा भाग म्हणून अगदी बिंधास्तपणे असे सीन्स केलेत. त्यातच अभिनेत्री स्मिता तांबे हिचं देखील नाव येतं. नुकतच स्मिता तांबे हिने एका मुलाखतीमध्ये इंटीमेट सीन्सवर केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलंय.
मला ते सीन्स करताना अजिबात लाज वाटत नाही - स्मिता तांबे
स्मिताने नुकतच इट्स मज्जा या वेब पोर्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. तसेच असे सीन्स करताना तिची मानसिकता कशी तयार होते, यावरही तिनं भाष्य केलंय. तिने बोलताना म्हटलं की, 'मी कधीही किसिंग सीन्स करताना अस्वस्थ होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मी निलेश दिवेकरसोबत कँडल मार्च सिनेमात इंटीमेट सीन्स दिले होते. त्यावेळी सेटवरच्या सर्वांना अवघडल्यासारखं झालं, पण मला अजिबात विचित्र वाटलं नाही. तेव्हा मी निलेशलासुद्धा हे सांगितलं होतं. असे सीन करतानां मला लाज वाटत नाही कारण, त्या पात्राचा सरावाचाच तो एक भाग आहे.'
'त्या पात्राचं ज्याप्रमाणे भांड उचलण्याची विशिष्य पद्धत असते, पाणी पिण्याची पद्धत असते, उठण्याची, बसण्याची लकब असते, त्याचप्रमाणे हे देखील सहज दृश्य आहे. त्या चित्रपटाच्या कथेनुसार जर इंटीमेट सीन असतील तर मग ते कधीच विचित्र किंवा वल्गर वाटणार नाही', असंही तिनं पुढं म्हटलं.