एक्स्प्लोर

Smart Sunbai Upcoming Marathi Movie: सस्पेन्स, कॉमेडी आणि इमोशन्सचा अनोखा मेळ; 'स्मार्ट सुनबाई'मध्ये झळकरणार 20हून अधिक सुपरस्टार्स

Smart Sunbai Upcoming Marathi Movie: नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उत्सुकतेनं सजलेला एक धमाल मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Smart Sunbai Upcoming Marathi Movie: सस्पेन्स, कॉमेडी आणि भावबंधांचा मेळ साधणारा शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित नवा मराठी चित्रपट 'स्मार्ट सुनबाई' 21 नोव्हेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उत्सुकतेनं सजलेला एक धमाल मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित हास्य, थरार आणि गूढतेनं भरलेला एक नवाकोरा सिनेमा 'स्मार्ट सुनबाई' 21 नोव्हेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमाचं जबरदस्त पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.  

या चित्रपटाच्या पोस्टरनं प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्याची ठिणगी पेटवली आहे. पोस्टरवरूनच हे स्पष्ट होतंय की, या कथेत काहीतरी विलक्षण आणि गूढ दडलेलं आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तर पोस्टर वरील काही कलाकार शहरी लूकमध्ये तर काही कलाकार ग्रामीण लूकमध्ये दिसत आहेत. याच वैविध्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. 

'स्मार्ट सुनबाई'मध्ये झळकणार स्टार कास्ट 

"ही स्मार्ट सुनबाई नक्की कोण? आणि तिच्या आयुष्यात असं काय घडणार आहे?", या प्रश्नानं प्रेक्षकांच्या मनात गोंधळ घातला आहे. रोहन पाटील, संतोष जुवेकर, भाऊ कदम, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमगर, स्नेहल शिदम, किशोरी शहाणे, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, आर्या सकुंडे , वैशाली चौधरी , सपना पवार , कांचन चौधरी यांसारखे दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार या सिनेमात झळकणार असून, त्यांची केमिस्ट्रीच या चित्रपटाची खरी जमेची बाजू ठरणार आहे , प्रत्येक सुनेला 'स्मार्ट सुनबाई' होण्यासाठी हा चित्रपट नक्कीचं प्रेरणादायी ठरेल, असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितलं आहे.

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले असून, विजय नारायण गवंडे,साई - पियुष यांनी या सिनेमाला बहारदार संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख, अदिती द्रविड असून अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, उर्मिला धनगर यांचे सुरेल स्वर या सिनेमाला लाभले आहेत.

प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण करणारा हा नवीन सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित चित्रपट 'स्मार्ट सुनबाई' 21 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनादरम्यान '3 इडियट्स'ची पुन्हा एंट्री; कधी रिलीज होणार आमिर खानचा गाजलेला चित्रपट?
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनादरम्यान '3 इडियट्स'ची पुन्हा एंट्री; कधी रिलीज होणार आमिर खानचा गाजलेला चित्रपट?
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad khandekar: 'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...
'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...
Amchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध अभिनेत्रीचं 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक; 'आमच्या लाडक्या नाईक बाई' नव्या मालिकेत साकारणार मुख्य भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीचं 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक; 'आमच्या लाडक्या नाईक बाई' नव्या मालिकेत साकारणार मुख्य भूमिका
Cockroach janta party Protest: CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Devendra Fadnavis on Delhi LathiCharge: दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही पण...
दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही पण...
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Embed widget