'स्मार्ट सुनबाई' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; 20हून अधिक सुपरस्टार्स; अजित पवारांनी केलं पोस्टरचं अनावरण, चाहत्यांचा उत्साह शिगेला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्टरचे अनावरण करताना टीमचे कौतुक केले आणि दिलेल्या शुभेच्छांनी कार्यक्रमात आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झालाय.

Marathi Movie: मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असलेला आगामी चित्रपट ‘स्मार्ट सुनबाई’ आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास अगदी तयार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत या सिनेमाच्या पोस्टरचं नुकतंच अनावरण झालं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये सिनेमाविषयीचं कुतूहल निर्माण झालंय. हा सिनेमा 21 नोव्हेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उत्सुकतेनं सजलेला एक धमाल मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Smart Sunbai Marathi Movie)
दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून, निर्मिती गोवर्धन दोलताडे आणि गार्गी यांनी केली आहे. कार्तिक दोलताडे पाटील सहनिर्माता असून, पोस्टर अनावरणाच्या कार्यक्रमाला लेखक व निर्माता गोवर्धन दोलताडे, अभिनेता रोहन पाटील आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्टरचे अनावरण करताना टीमचे कौतुक केले आणि दिलेल्या शुभेच्छांनी कार्यक्रमात आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झालाय.
तगडी स्टारकास्ट, चाहत्यांचे खास आकर्षण
चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि अनुभवी कलाकारांचा मोठा समावेश आहे. संतोष जुवेकर, रोहन पाटील, भाऊ कदम, किशोरी शहाणे, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, विनम्र बाबल, सायली देवधर, प्राजक्ता गायकवाड, प्राजक्ता हनमगर, स्नेहल शिदम, उषा नाईक, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार, कांचन चौधरी. त्यांच्या अनोख्या केमिस्ट्रीमुळे हा सिनेमा प्रेक्षकांसाठी खास आकर्षक ठरेल असे सांगितले जात आहे.
कथा आणि लेखन योगेश शिरसाट, संगीत विजय नारायण गवंडे आणि साई-पियुष, गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड, तर सुरे अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, उर्मिला धनगर यांनी दिली आहेत. संगीत आणि गीतांच्या जोरदार योजनेमुळे सिनेमाचे भावनिक आणि मनोरंजक प्रभाव अधिक वाढले आहेत. ‘स्मार्ट सुनबाई’ हा कौटुंबिक मेजवानीसारखा अनुभव देणारा सिनेमा आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर हसण्याची, आनंदाची छाप सोडेल.प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण करणारा हा नवीन सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित चित्रपट 'स्मार्ट सुनबाई' 21 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
























