एक्स्प्लोर

मोठी बातमी : 'धडक 2' अवॉर्ड नांदेडच्या दिवंगत सक्षम ताटेला समर्पित, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची रोखठोक भूमिका

Nanded Crime Saksham Tate Case: मंचावरून सिद्धांत याने सक्षम ताटेला श्रद्धांजली अर्पण करत अत्यंत संवेदनशील मेसेज दिला आहे.

मुंबई :  'धडक २' या चित्रपटात नीलेशची भूमिका साकारून प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मने जिंकणारा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) याला अलीकडेच या भूमिकेसाठी पॉवर पॅक्ड परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र हा सन्मान स्वीकारताना त्यानी तो स्वतःपुरता न ठेवता तो नांदेडमध्ये प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून बळी ठरलेल्या दिवंगत सक्षम ताटे (Saksham Tate) या मृत तरूणाला समर्पित केला आहे. मंचावरून सिद्धांत (Siddhant Chaturvedi) याने सक्षम ताटेला श्रद्धांजली अर्पण करत अत्यंत संवेदनशील मेसेज दिला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Siddhant Chaturvedi (@siddhantchaturvedi)

सिद्धांत म्हणाले, “हा पुरस्कार फक्त माझा नाही. जात या आधारावर ज्यांना बहिष्कृत केलं गेलं, दुय्यम वागणूक दिली गेली, भेदभाव सहन करावा लागला, त्यांच्याही जिद्दीचा हा सन्मान आहे. परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी उभं राहण्याचा, लढण्याचा आणि अस्तित्व टिकवण्याचा अधिकार मिळवला. त्यांची ही जिद्द मला सलाम करायला लावते. त्यामुळे हा पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतो, ज्यांच्या मागे त्यांचं कुटुंब, त्यांचा गाव आणि आज माझं मनही उभं आहे.”

यानंतर सिद्धांतनी ‘धडक 2’च्या दिग्दर्शिका शाझिया इकबाल यांचे विशेष आभार मानले. “चित्रपटाला प्रत्येक वादळातून त्यांनी सावरले,” असे त्यानी यावेळी म्हटलं आहे. तसेच लेखक राहुल बडवेलकर यांच्या कार्याची दाद देत, “या कथेतल्या शांततेला त्यांनी खऱ्या अर्थाने आवाज दिला,” असेही सिद्धांतनी यावेळी बोलताना नमूद केले.

या व्यक्तिगत आणि मनापासून केलेल्या समर्पणातून सिद्धांत चतुर्वेदी यांनी आपल्या गौरवाच्या क्षणाचा वापर सामाजिक वास्तवांना आवाज देण्यासाठी केला. त्याचा संदेश स्पष्ट होता ‘धडक 2’सारख्या कथा धैर्याने, धाडसाने, संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणाने सांगितल्या जात राहायला हव्यात. सिद्धांतच्या पुढील प्रकल्पांविषयी बोलायचे झाल्यास, त्यांचा पुढील चित्रपट ‘दो दीवाने शहर में’ येत्या 20 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून, यात ते प्रथमच अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत नव्वदच्या दशकातील प्रेमकथा साकारताना दिसतील.

Saksham Tate: सक्षम ताटे हत्या प्रकरण काय?

नांदेडच्या इतवारा परिसरात काही दिवसापूर्वी प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून सक्षम ताटे (वय 20) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सक्षम ताटे याचे आचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे आचलच्या कुटुंबीयांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. याच वादातून आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि हिमेश मामीडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशी व दगडाने मारुन सक्षम ताटे याची हत्या (Nanded Murder) केली होती. सक्षम ताटे आणि मामीडवार कुटुंबीय हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. सक्षम ताटे काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. गजानन मामीडवार यांनी सक्षमला त्यांच्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, सक्षम आणि आचल यांचे प्रेमप्रकरण सुरु राहिलेया मामीडकर कुटुंबीयांनी गुरुवारी त्याला संपवले होते. (Nanded girl weds with boyfriend dead body) या घटनेनंतर हे प्रकरण देशभरात चर्चेत आले आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Embed widget