Shweta Pendase : श्वेता पेंडसेचं 'अ परफेक्ट मर्डर'मध्ये पुन्हा एन्ट्री, नाटकाच्या कथेला मिळणार नवी कलाटणी
Shweta Pendase : 'अ परफेक्ट मर्डर' या नाटकात आता एक नवी एन्ट्री होणार आहे. या एन्ट्रीमुळे नाटकाच्या कथानकाला वेगळं वळण मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय.
![Shweta Pendase : श्वेता पेंडसेचं 'अ परफेक्ट मर्डर'मध्ये पुन्हा एन्ट्री, नाटकाच्या कथेला मिळणार नवी कलाटणी Shweta Pendase entry in A perfect Murder Marathi Play Entertainment Marathi news Shweta Pendase : श्वेता पेंडसेचं 'अ परफेक्ट मर्डर'मध्ये पुन्हा एन्ट्री, नाटकाच्या कथेला मिळणार नवी कलाटणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/29/ddbb30955ccc109393b2b1903829a6561722248091206720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shweta Pendase : गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचं मनोरंजन करीत ‘अ परफेक्ट मर्डर’ (A Perfect Murder) नाटकाने आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. खून लपवण्याचा आणि खुनामागचं खरं रहस्य उलगडण्याचा खेळ म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक. अनेक नावाजलेल्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. नाटकाला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी अभिनेत्री श्वेता पेंडसे लेडी इन्स्पेक्टर म्हणून समोर येणार आहे. या वेगळ्या भूमिकेद्वारे ती या नाटकात पुनरागमन करत आहे.
आपल्या उत्तम आणि सयंम अभिनयाने डॉ. श्वेता पेंडसे हिने अनेक भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत. आता 'अ परफेक्ट मर्डर’ या नाटकासाठी तिने खाकी वर्दी चढवली आहे. रहस्यांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक याच्या एका मर्डर मिस्ट्रीचे मराठीत रूपांतर करत लेखक निरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा उत्तम पट रंगमंचावर मांडला आहे.
नाटकाला मिळणार नवी कलाटणी
घटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी हे या नाटकाचं वैशिष्टय असून लवकरच या नाटकात अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे खाकी वर्दीत दिसणार असून तिच्या येण्याने नाटकाला कलाटणी मिळणार आहे. बदामराजा प्रॉडक्शन्स संस्थेच्या या नाटकाचे निर्माते माधुरी गवांदे, निनाद कर्पे आहेत.
ही भूमिका तितकीच चॅलेंजिंग - श्वेता पेंडसे
खूप कमी सस्पेन्स नाटकं मनाचा ठाव घेतात, नाट्यरसिकांना गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत नाटाकाची रंजकता वाढावी लागते. श्वेताच्या येण्याने नाटकाला काय कलाटणी मिळणार? ती खुनाचा कट ‘परफेक्ट’ उलगडू शकेल का? हे पाहणं नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. ‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटक म्हटलं की कथेसोबत कलाकारांच्या अभिनयाचा कस असतो. माझ्यासाठी ही भूमिका तितकीच चॅलेंजिंग असल्याचं म्हणत श्वेताने भावना व्यक्त केल्या आहेत.
या नाटकाचा हा 345 प्रयोग असून ऑपेरा हाऊस मधील ५ व्या प्रयोगाचे प्रस्तुतकर्ते आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस हे आहेत.‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचे लेखन आणि नेपथ्य नीरज शिरवईकर यांचं आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)