एक्स्प्लोर

Shreyas Talpade on Heart Attack: '10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...', श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका, शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

Shreyas Talpade on Heart Attack: शुटिंगदरम्यान श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.

Shreyas Talpade Opens Up About His Cardiac Arrest: अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) केवळ मराठी सिनेसृष्टीत नाही तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. त्याने आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याच्या प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं आहे.  श्रेयस तळपदे (Bollywood) हा गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ सिनेइंडस्ट्रीत कार्यरत होता.  तो अलिकडेच 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Jungle) या सिनेमात झळकला होता.  हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.  त्याच्या या सिनेमातील अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात येत आहे.  दरम्यान, या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यानचा किस्सा त्यानं शेअर केला आहे.    

'वेलकम टू द जंगल' या सिनेमाच्या चित्रिकरणावेळी श्रेयस तळपदेसोबत एक भयंकर घटना घडली होती. डिसेंबर 2023 साली त्याला हृदयविकाराचा झटका आला होता.  ज्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची चित्रीकरणादरम्यान त्याची प्रकृती खालवली होती. श्रेयसच्या पत्नीने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. हॉस्पिटलमध्ये नेत असताना तो बेशुद्ध पडला होता.  

श्रेयस तळपदेला आलेला हृदयविकाराचा तीव्र झटका (Shreyas Talpade Opens Up About His Cardiac Arrest in Interview)

यानंतर त्याला शुद्धीवर आणण्यात आले आणि त्याची सर्जरी करण्यात आली.  त्या दिवशी नेमकं काय घडलं?  कर्ली टेल्स या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्याने दुसऱ्या जीवनदानाबद्दल किस्सा सांगितला. 'तो काळ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होता', असं श्रेयस तळपदेनं आपल्या मुलाखतीत सांगितलं.  त्या एका घटनेनंतर त्याच्या आयुष्यात बरेच बदल झाले, असंही त्याने आपल्या मुलाखतीत सांगितलं. 

'पूर्वी मी केवळ कामाला महत्त्व देत होतो. माझ्यासाठी माझं काम खूप महत्त्वाचं होतं.  मी वारंवार, मला काम करायचं आहे, असं म्हणायचो.  पण कुटुंबाला क्वालिटी टाइम देणं, हेही तितकंच गरजेचं आहे.  पण त्यावेळी एका क्षणात माझ्यासोबत सगळं काही घडलं. 10 मिनिटांसाठी टेक्निकली मी मेलो होतो.  माझ्या हृदयाचे ठोके 10 मिनिटांसाठी बंद पडले होते.  त्यांना मला पुन्हा जिवंत करावं लागलं. जसं चित्रपटात दाखवतात,  आधी मला CPR देण्यात आलं. नंतर मला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला', असं श्रेयस म्हणाला. 

श्रेयस तळपदेनं सांगितलं की, त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका गाडीमध्ये आला होता.  त्याच्या पत्नीने श्रेयसची काळजी घेतली.  तसेच रुग्णालयात घेऊन गेली. रुग्णालयात त्याच्यावर तातडीने ऑपरेशन करण्यात आले.  तेव्हा श्रेयसला जाणवलं की, आयुष्यात फक्त काम हे सर्वस्व नसतं.  आता ते परिवाराला अधिक वेळ देतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Embed widget