एक्स्प्लोर

Shreya Bugde On Chala Hawa Yeu Dya Team: 'चला हवा येऊ द्या'च्या टीममध्ये धुसफूस? अखेर श्रेया बुगडेनं मौन सोडलं, कोणतेही आढेवेढे न घेता थेट म्हणाली...

Shreya Bugde On Chala Hawa Yeu Dya Team: 'चला हवा येऊ द्या'च्या टीममध्ये धुसफूस असल्याचंही बोललं गेलं. पण नेमकं झालेलं काय? याचं उत्तर आता त्याच टीममधली स्टार अभिनेत्री श्रेया बुगडे हिनं दिलंय.

Shreya Bugde On Chala Hawa Yeu Dya Team: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). अख्ख्या महाराष्ट्रानं या कार्यक्रमावर भरभरुन प्रेम केलं. तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं निरोप घेतला. त्यानंतर या मराठमोळ्या कार्यक्रमाचं (Marathi Show) दुसरं पर्व, 26 जुलैपासून झी मराठीवर (Zee Marathi) सुरू झालं पण, नव्या बदलांसह. पण, या नव्या पर्वात ज्या 'चला हवा येऊ द्या'च्या (Chala Hawa Yeu Dya Marathi Show) टीमवर महाराष्ट्रानं भरभरुन प्रेम केलं, ती संपूर्ण टीम दिसली नाही. अनेक चर्चांना उधाण आलं. तर, कित्येक तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. 

महत्त्वाची बाब म्हणजे, निलेश साबळे (Nilesh Sable) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) ही प्रेक्षकांची दोन लाडकी व्यक्तीमत्त्व नव्या पर्वात दिसली नाहीत. नव्या पर्वाची घोषणा होताच, हे दोघे का नाहीत? यावरुन बराच गदारोळ झाला. त्यावेळी आम्ही वेगळ्या कामांमध्ये बिझी आहोत, असं उत्तर दोघांकडूनही देण्यात आलं. पण, तरी महाराष्ट्राच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत राहिली. 'चला हवा येऊ द्या'च्या टीममध्ये धुसफूस असल्याचंही बोललं गेलं. पण नेमकं झालेलं काय? याचं उत्तर आता त्याच टीममधली स्टार अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) हिनं दिलंय. श्रेयानं एका मुलाखतीत बोलताना त्यावेळी नेमकं काय घडलेलं हे सांगितलंय. 

अभिनेत्री श्रेया बुगडे नेमकं काय म्हणाली? (Shreya Bugde On Chala Hawa Yeu Dya)

'मित्र म्हणे'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्रेया बुगडे म्हणाली, "चला हवा येऊ द्या' जेव्हा पहिल्या सीझन थांबलं तेव्हाच असं ठरलं होतं की, जेव्हा ते कधीही परत येईल तेव्हा ते सीझन बेस्डच असेल. ते कधीच पुन्हा 10 वर्षांसाठी होणार नव्हतं. कारण आता ट्रेण्ड्स बदलले आहेत. लोकांना नवीन नवीन बघायचंय. वाहिनी म्हणून ते वेगळ्या पद्धतीने याकडे बघतायेत. त्यांच्या पण काही गोष्टी आहेत ज्या त्यांना फॉलो करायच्या आहेत. प्रचंड स्पर्धा आहे. आता तर ओटीटी पण आहे. टेलिव्हिजनचीही गणितं बदलली आहेत. त्यामुळे दुसरा सीझन लवकर संपला, असं नाही तर हा सीझन एवढाच असणार होता. मर्यादित भागांचाच असणार होता. सोबतच डॉ. निलेश साबळेंचं सिनेमाचं काम सुरू होतं. भाऊ एका वेगळ्या सिनेमासाठी शूट करत होता. त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे जी टीम एकत्र आली ती ही होती..."

"आमचं बाँण्डिंग अजूनही तसंच आहे. अजूनही आम्ही महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करतो, तेव्हा सगळे एकत्रच असतो. नुकतंच मी आणि भाऊ एका कार्यक्रमात होतो. कुशल, मी, भाऊ, भारत दादा आम्ही भेटत राहतो... माझी तर इच्छा आहे की, आमची टीम पुन्हा वेगळ्या स्वरुपात, कार्यक्रमात परत यावी. डॉक्टर तर इतके टॅलेंटेड आहेत त्यांच्याकडे एवढ्या भन्नाट संकल्पना असतात त्यामुळे वाहिनीची साथ मिळाली आणि आम्ही तर आहोतच तर हे नक्की घडू शकेल...", असं श्रेया बुगडे म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ranbir Kapoor Visit Marathi Actress Smita Jaykar House: बॉलिवूडचा बडा दिग्दर्शक अन् अभिनेता अचानक मराठी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले, जमिनीवर मांडी घालून जेवायला बसले, कोळंबीचा रस्सा...

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Aata Hou De Dhangana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पाचव्या पर्वात मोठा ट्विस्ट!यंदा कलाकारांची धमाल रंगणार चक्क बेटावर, नेमकं काय होणार?
Toxic Siddharth Malhotra Post: 'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
'टॉक्सिक'मधल्या इंटिमेट सीनवरून कियारा ट्रोल होताना दिसताच सिद्धार्थ मल्होत्राची पोस्ट; ट्रोलर्सची बोलती बंद, म्हणाला...
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Embed widget