एक्स्प्लोर

Ranbir Kapoor Visit Marathi Actress Smita Jaykar House: बॉलिवूडचा बडा दिग्दर्शक अन् अभिनेता अचानक मराठी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले, जमिनीवर मांडी घालून जेवायला बसले, कोळंबीचा रस्सा...

Ranbir Kapoor Visit Marathi Actress Smita Jaykar House: बॉलिवूडचे दिग्गज कलाकार खऱ्या आयुष्यात अगदीच साधे असतात, असं एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं एक उदाहरण देऊन सांगितलं आहे. 

Ranbir Kapoor Visit Marathi Actress Smita Jaykar House: बॉलिवूडचं (Bollywood News) ग्लॅमरस जग आणि त्यात वावरणाऱ्या सेलिब्रिटींबाबत चाहत्यांना नेहमीच कुतूहल असतं. सर्वसामान्यांना नेहमीच सेलिब्रिटींबाबत अनेक प्रश्न पडतात. तर, बऱ्याचदा सेलिब्रिटी आहे म्हटल्यावर अॅटिट्यूड तर सोबत घेऊनच फिरत असणार, असंही वाटत असतं. पण, मुळात पडद्यामागचं वास्तव अगदी उलट आहे. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार खऱ्या आयुष्यात अगदीच साधे असतात, असं एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं (Marathi Actress) एक उदाहरण देऊन सांगितलं आहे. 

मराठी मनोरंजन विश्वातील (Marathi Film Industry) अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूडमध्येही मोठं नाव कमावलंय. अशीच एक अभिनेत्री जिनं मराठी पडद्यासोबतच, बॉलिवूडचा पडदाही आपल्या दमदार अभिनयानं गाजवला, त्या म्हणजे,  अभिनेत्री स्मिता जयकर. 'परदेस', 'हम दिल दे चुके सनम, 'देवदास', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' अशा एकापेक्षा एक गाजलेल्या सिनेमांमध्ये अभिनेत्री स्मिता जयकर यांनी दमदार भूमिका साकारल्या. रुपेरी पडद्यावर त्या विश्व सुंदर ऐश्वर्या रायची आई साकारताना दिसल्या, तर कधी रणबीर कपूरच्या आईच्या भूमिकेत दिसल्या. त्यांनी या सर्व कलाकारांसोबतचं नातं पडद्यावरच नाहीतर, खऱ्या आयुष्यातही जपलं. कलाकारांसोबतच्या अनमोल नात्याचा आणि त्यांच्यातल्या साधेपणाचा अनुभव स्मिता जयकर यांनी शेअर केला आहे. 

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्मिता जयकर यांनी रंजक किस्सा सांगितला. 'अजब प्रेम की गजब कहाणी' (Ajab Prem Ki Ghazab Kahani) या सिनेमात त्यांनी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यासोबत काम केलं होतं. 2009 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात कतरिना कैफ (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत होती, तर स्मिता जयकर यांनी रणबीरच्या आईची भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच त्यांची आणि रणबीरची ओळख झाली होती. रणबीर अजून इंडस्ट्रीत सक्रिय होण्यापूर्वी संजय लीला भन्साळी यांच्यासोबत तो त्यांच्या घरी आला होता आणि अगदी त्यांच्या घरात खाली जमिनीवर बसून कोळंबीच्या कालवणावर ताव मारलेला, असंही त्यांनी सांगितलं.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Smita Jayakar (@smitajayakar_official)

मराठी अभिनेत्री स्मिता जयकर नेमकं काय म्हणाल्या? (Smita Jaykar On Ranbir Kapoor)

मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवणाऱ्या मराठमोळ्या स्मिता जयकर म्हणाल्या की, "रणबीर कपूर माझ्या धाकट्या मुलाला ओळखत होता. तो अगदी साधा आहे... बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Bollywood Famous Fashion Designer) सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee), दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Filmmaker Sanjay Leela Bhansali) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे तिघंही काही वर्षांपूर्वी माझ्या घरी आले होते. ते लोक नेमके जेवायच्या वेळेला आले होते. संजयला (भन्साळी) माझ्या हातचं कोळंबीचं कालवण वगैरे खूप आवडायचं... मी या तिघांना कोलंबीचं कालवण वाढलं, रणबीर एवढा साधा आहे की, तो माझ्या घरी जेवायला खाली जमिनीवर बसला होता..."

"मला संजयनं सब्यसाची मुखर्जीशी ओळख करून दिली, तेव्हा रणबीर खूपच लहान होता. तिघेही मस्त जेवले खरंतर, मला तो रणबीर कपूर आहे, हे देखील नंतर समजलं, कारण त्यानं इंडस्ट्रीत पदार्पण केलं नव्हतं... तेव्हा रणबीर संजय लीला भन्साळींना असिस्ट करत होता. ही सगळी लोक खरंच खूप साधी माणसं आहेत, आपल्याला सिनेमे पाहून किंवा ते बाहेर वावरतात तेव्हा त्यांच्याकडे पाहून कुतूहल वाटतं कारण, कलाकारांच्या भोवती सगळ्या चाहत्यांची सतत गर्दी असते म्हणून, साहजिकच त्यांना तसा अॅटिट्यूड ठेवावा लागतो... पण, प्रत्यक्षात ते फार साधे आहेत..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Actress Sushma Jaywant On Marathi Language: '...मराठी माणूस आहे ना! त्याला तुम्ही पहिली सक्ती करा...'; 'कमळी' फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत, मराठीच्या मुद्द्यावर थेट म्हणाली...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Pamela Serena: 'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती
'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती
Musafir Cafe Vikrant Messy Fee: विक्रांत मॅसीच्या वेबसिरीजचा OTT वर धुमाकूळ, 8 एपिसोडसाठी घेतलं कोट्यवधींचं मानधन! चर्चा रंगली
विक्रांत मॅसीच्या वेबसिरीजचा OTT वर धुमाकूळ, 8 एपिसोडसाठी घेतलं कोट्यवधींचं मानधन! चर्चा रंगली
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Tamil Actress Anandi Ajay : विजय थलपतीच्या 'जन नायगन' चित्रपटातून सीन कापला, अभिनेत्री ढसा ढसा रडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
विजय थलपतीच्या 'जन नायगन' चित्रपटातून सीन कापला, अभिनेत्री ढसा ढसा रडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Embed widget