Shefali Jariwala Funeral: डोक्यावरुन हात फिरवला, नंतर तिच्या कपाळावर ओठ टेकवले अन् आसवांचा बांध मोकळा केला; पती परागनं पत्नी शेफालीला दिला अखेरचा निरोप VIDEO
Shefali Jariwala Funeral Video: शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्काराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये पराग त्यागी शेफालीच्या पार्थिवाजवळ बसून ढसाढसा रडताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

Shefali Jariwala Funeral Video: बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) निधन झालंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानं अभिनेत्रीचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी (29 जून 2025) शेफाली जरीवालावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेफालीच्या अकाली निधनानं अख्खं बॉलिवूड हादरलं. शेफालीला अखेरचा अलविदा करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यावेळचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हिडीओमध्ये शेफालीचा पती पराग त्यागी आणि अभिनेत्रीची आई शेफालीला अखेरचा निरोप देत असल्याचं दिसतंय. यामध्ये पराग आणि शेफालीच्या आईची अवस्था पाहून तुमच्याही डोळ्यांतून पाणी येईल.
शेफालीचं जाणं अनेकांसाठी धक्का होता. काही मिनिटांपूर्वी अगदी धडधाकट दिसणारं आपलं माणूस काही क्षणांतच आपल्यातून कायमचं निघून जाणं, म्हणजे काय? याचा विचारही आपण करु शकत नाही. पराग त्यागी शेफालीच्या मृत्यूचं वृत्त आल्यापासून अगदी स्वतःला सावरुन वावरत असल्याचं अनेक व्हिडीओंमध्ये पाहायला मिळालं. पण, शेफालीला अखेरचा अलविदा म्हणताना मात्र पराग त्यागीचा बांध सुटला आणि त्यानं आसवांना वाट मोकळी करुन दिलीच.
View this post on Instagram
42 वर्षीय अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालं. आता तिच्या अंत्यसंस्काराचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. जे व्हिडीओ मन हेलावणारे आहेत. व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये शेफालीच्या पार्थिवाजवळ तिचा पती आणि तिची आई बसलीय. यामध्ये तिच्या आईची अवस्था पाहवत नाहीये. आपल्या काळजाच्या तुकड्याला अखेरचा निरोप देताना, शेफालीच्या आईला काय वाटत असेल? याचा साधा विचारही आपण करू शकत नाही.
View this post on Instagram
शेफालीच्या पार्थिवाजवळच बसून होता पराग त्यागी
व्हिडीओमध्ये पराग शेफालीला पुन्हा पुन्हा मिठी मारुन रडताना दिसत होता. ते क्षण सर्व उपस्थित असलेल्यांचं काळीज पिळवटणारे आहेत. शेफालीचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.

हिंदुस्तानी भाऊ हळहळला
शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी तिच्या घरी पार पडले. या दरम्यान, हिंदुस्तानी भाऊ प्रत्येक क्षणी शेफालीचा पती पराग त्यागीसोबत असल्याचं पाहायला मिळालं. ती माझी बहिण होती, अशी भावूक प्रतिक्रियाही हिंदुस्थानी भाऊनं यावेळी दिली. शेफालीच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी हिंदुस्थानी भाऊनं पार पाडले. खरंतर, बिग बॉसनंतर, शेफाली जरीवाल दरवर्षी हिंदुस्तानी भाईला राखी बांधायची.

कसा झाला शेफाली जरीवालाचा मृत्यू?
दरम्यान, 29 जून 2025 रोजी शेफाली जरीवालाचं निधन झालं. मीडिया रिपोर्टनुसार, शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यानं तिचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























