भारतात माणसाचं आयुष्य स्वस्त झालंय... 4 लोक मेले...; मराठमोळ्या अभिनेत्यानं खूप सुनावलं, नेमकं काय घडलं?
Shashank Ketkar Video On Wrong Parking: शशांक केतकरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आगपाखड केलीय आणि म्हटलंय की, "भारतामध्ये माणसाचं आयुष्य स्वस्त झालंय..."

Shashank Ketkar Video On Wrong Parking: मराठमोळा अभिनेता शशांक केतकरचा (Shashank Ketkar) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Video Viral) होत आहे. तसं पाहिलं तर शशांक नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपलं मत मांडत असतो. पण, या व्हिडीओची सुरुवातच शशांकनं भारतामध्ये माणसाचं आयुष्य स्वस्त झालंय... असं म्हणतच केली. नेमकं झालंय काय? शशांक असं का म्हणाला? सविस्तर जाणून घेऊयात.
शशांक केतकर ठाण्यातील ज्या परिसरात राहतो, तिथे त्याच्या सोसायटीसमोर एका माणसानं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं एक गाडी पार्क केली होती. याचीच दखल शशांकनं त्याच्या व्हिडीओमधून घेतली आहे. शशांकनं व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीनं गाडी कशी पार्क केली, हे सुद्धा दाखवलं आहे. तसेच, गाडी पार्क करणाऱ्या व्यक्तीवर आगपाखडही केली आहे. त्यासोबतच शशांकनं प्रशासनाला आवाहन करत ही गाडी फक्त उचलू नका, तर स्क्रॅप करा, असं सांगितलं आहे.
शशांकनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिलं आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "ठिकाण-वसंत विहार ठाणे! समस्या- double parking! त्रास- घंटा काहीही नाही ! उपाय - 4 लोक मेले की बघू!"
व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाला शशांक केतकर?
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शशांकनं म्हटलंय की, "भारतामध्ये माणसाचं आयुष्य आणि जगणं हे अत्यंत स्वस्त आहे आणि त्याची किंमत शून्य आहे, याची दुर्दैवाने पुन्हा पुन्हा प्रचिती येते. ठाण्यातील माझ्याच सोसायटीच्या समोर एका माणसाने कमालीचं पार्किंग केलं आहे. रिकाम्या जागेत एक वेगळी गाडी उभी होती, त्यांना ती काढायची होती, म्हणून चार माणसांनी डबल पार्किंग केलेली गाडी आणखी बाहेर आणून ठेवली. आता ती पूर्ण रस्त्यावर आलेली आहे."
"या गाडीनं रस्त्यावरची इतर जागा इतकी व्यापली आहे की, ज्यामुळे रस्त्यावरच्या लोकांना चालताना समस्या येतेय. आपल्याकडे प्रॉब्लेम हाच आहे, या गाडीला आपटून चार माणसं मेली तरी काय फरक पडत नाही. आमच्या वसंत विहारमध्ये डबल पार्किंग करतात हा विषय तर मोठा आहेच. पण डबल पार्किंग केल्यानंतर त्याच्या मागची पार्किंग केलेली गाडी ज्यांना काढायची होती, त्यांनी दुसरी गाडी अशी बाहेर आणून ठेवली ज्याचा लोकांना किती त्रास होणार आहे हे तुम्हीच बघा. आहे की नाही गंमत! खरंच आपल्याकडे जीव स्वस्त झाला आहे. मला माहित नाही ठाणे महानगरपालिकेची ही थेट जबाबदारी असते की नसते. पण त्यांना असं सांगणं आहे की, ही गाडी फक्त उचलू नका, तर स्क्रॅप करा...", असं शशांक केतकर म्हणाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सातव्या महिन्याची गरोदर असेपर्यंत 'चार दिवस सासूचे' मालिकेचं शूटींग केलंय, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
























