Shashank Ketkar Shares Video On Mumbai Traffic: 'हे बघा डेव्हलपमेंटच्या डेव्हलपमेंटमध्ये मी अडकलोय...'; मराठी अभिनेत्याला प्रचाराच्या रणधुमाळीचा फटका, व्हिडीओ शेअर करुन व्यक्त केली चीड, संताप
Shashank Ketkar Shares Video On Mumbai Traffic: प्रचाराच्या रणधुमाळीचा फटका मराठी अभिनेत्याला बसला आहे. मराठी अभिनेता शशांक केतकरनं यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

Shashank Ketkar Shares Video On Mumbai Traffic: 'होणार सून मी ह्या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi), 'मुरांबा' (Muramba) यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता (Marathi Actor) शशांक केतकर (Shashank Ketkar) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रिय असतो. शशांक केतकर नेहमीच अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो. एवढंच काय तर, आजवर शशांक केतकरनं उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखलही प्रशासनानं घेतली आहे. आता शशांकनं आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरतोय. शशांक केतकरनं या व्हिडीओतून संताप, चीड व्यक्त केली आहे. तसेच, हा व्हिडीओ अभिनेत्यानं बीएमसी, शिवसेना आणि मनसेला टॅग केलं आहे.
सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. 29 महापालिका निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या राज्यभरात आचारसंहिता लागू करण्यात आली असून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय. तर, कुठे प्रचार सभा, रॅलींचं आयोजन करण्यात येतंय. अशातच आता या प्रचाराच्या रणधुमाळीचा फटका मराठी अभिनेत्याला बसला आहे. मराठी अभिनेता शशांक केतकरनं यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
शशांकनं नुकताच एक इन्स्टग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमधून त्यानं संताप व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या रॅलीमुळे ट्राफिक झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतंय.
व्हायरल व्हिडीओमध्ये शशांक केतकर काय म्हणाला? (Shashank Ketkar Viral Video)
मराठी अभिनेता शशांक केतकर म्हणाला की, "मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी रॅली निघालीये. मतदान आलंय ना आता! आणि हे बघा डेव्हलपमेंटच्या डेव्हलपमेंटमध्ये मी अडकलोय, याच रॅलीमुळे. आणि असं नाहीये बरं का, ही रॅली नसती तर रस्ता मोकळा असतो, एकही खड्डा नाहीये, कमालीचा कम्प्फर्ट देतो हा रस्ता, असं अजिबात नाहीये. ही गत रोजची आहे. आज कारण वेगळं आहे. आहे की नाही गंमत... मस्त! मुंबईची डेव्हलपमेंट. आणि कुठलीही पार्टी कुठलीही रॅली, हे सगळ्यांसाठी आहे. अशीच करा डेव्हलपमेंट..." दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरनं बीएमसी, शिवसेनेला आणि मनसेला टॅग केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























