एक्स्प्लोर

Sharib Hashmi Wife Diagnos Six Times Cancer: आधीच पाचवेळा कॅन्सरवर मात, आता पुन्हा बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीला जीवघेण्या आजाराचं निदान; पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला...

Sharib Hashmi Wife Diagnos Six Times Cancer: 'द फॅमिली मॅन' सीरिजमधील अभिनेता शरीब हाश्मी यांची पत्नी नसरिन हाश्मी हिला सहाव्यांदा कर्करोगाचं निदान झालंय.

Sharib Hashmi Wife Diagnos Six Times Cancer: 'द फॅमिली मॅन' (The Family Man) वेब सीरिजमध्ये जेवढी अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी साकारलेला श्रीकांत तिवारी गाजला, त्याच्या बरोबरीनंच आणखी एक पात्र गाजलेलं ते म्हणजे, 'जेके तळपदे'. बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) शरीब हाश्मी (Sharib Hashmi) यानं 'द फॅमिली मॅन' (The Family Man Web Series) सीरिजमध्ये 'जेके तळपदे' ही भूमिका साकारुन सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. यापूर्वीही शरीब हाश्मी यानं फिल्म इंडस्ट्रीत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. पण, तुम्हाला माहितीय का? मनोज वाजपेयींसोबत 'द फॅमिली मॅन' वेब सीरिजमध्ये जरी शरीब हाश्मीनं सहाय्यक भूमिका साकारली असली, तरीसुद्धा खऱ्या आयुष्यात मात्र तो एक आदर्श 'फॅमिली मॅन' आहे. 

नुकत्याच एका पॉडकास्टला शरीब हाश्मी आणि त्याची पत्नी नसरिन हाश्मी (Nasreen Hashmi) यांनी मुलाखत दिली. Hauterrfly सोबतच्या पॉडकास्टमध्ये बोलताना या जोडप्यानं त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. अभिनेच्याच्या पत्नीला आतापर्यंत पाच वेळा तोंडाच्या कर्करोगाचं (Oral Cancer) निदान झालेलं. 2018 मध्ये जेव्हा तिला पहिल्यांदा आजाराचं निदान झालं, तेव्हापासून ती या आजाराशी लढा देत आहे. यावर बोलताना अभिनेत्यानं सांगितलं की, "नसरीनचा कर्करोग यापूर्वीच पाच वेळा पुन्हा उद्भवला आहे आणि आता तो सहाव्यांदा परतला आहे. यावेळी, तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरला आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशा कठीण काळात, मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात."

शरीब हाश्मी पुढे बोलताना म्हणाला की, "नसरीनच्या धैर्यामुळे संपूर्ण कुटुंबालाच बळ मिळालंय. तिनं नेहमीच या परिस्थितीचा अत्यंत धैर्यानं सामना केलाय... ती इतक्या निकरानं लढा देतेय की, तिच्या सोबतीनं आम्ही सर्वजणही लढवय्ये बनलोत."

शरीब हाश्मीची पत्नीला खंबीर साथ (Sharib Hashmi On Wife Nasreen Hashmi)

अभिनेत्याची पत्नी नसरीन हिनंही सांगितलंय की, रुग्णालयातील प्रत्येक व्हिजिट आणि प्रत्येक शस्त्रक्रियेच्या वेळी शरीब हाश्मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. नसरिन हाश्मी म्हणाली की, "तो कितीही व्यस्त असला किंवा शूटिंगमध्ये कितीही मग्न असला, तरीही तो कसाबसा वेळ काढून रुग्णालयात पोहोचायचाच... मला रुग्णालयात दाखल केल्याच्या क्षणापासून ते मला डिस्चार्ज मिळेपर्यंत, तो हातात आपली बॅग घेऊन तिथेच बसून राहायचा आणि तिथून दुसरीकडे कुठेही जायला नकार द्यायचा..."

नसरिननं पुढे बोलताना सांगितलं की, जेव्हा शरीबला तिच्या आजाराबद्दल पहिल्यांदा समजलं, तेव्हा तो पूर्णपणे कोलमडून गेलेला. शरीबनं सांगितलं की, "तिच्यावर आतापर्यंत पाच वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हा आजार पाच वेळा पुन्हा बळावला आहे. आता, सहाव्यांदा हा आजार पुन्हा परतला आहे. यावेळी तर तो तिच्या संपूर्ण शरीरात पसरला आहे. मात्र हे सुद्धा संकट नक्कीच टळून जाईल, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत..."

Sharib Hashmi Wife Diagnos Six Times Cancer: आधीच पाचवेळा कॅन्सरवर मात, आता पुन्हा बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीला जीवघेण्या आजाराचं निदान; पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला...

नसरीनने कर्करोगाशी सुरू असलेल्या आपल्या दीर्घकालीन लढ्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या भावनिक आणि आर्थिक परिणामांबद्दलही मनमोकळेपणानं भाष्य केलंय. ती म्हणाली की, "हा प्रवास आणि उपचारांची प्रक्रिया अत्यंत प्रदीर्घ काळ चालणारी आहे... ती मुळीच सोपी नाही. दर दीड वर्षांनी कर्करोग पुन्हा उद्भवतो आणि प्रत्येक वेळी, उपचारांसाठी मोठा खर्च येतो. वैद्यकीय खर्चाचा हा संपूर्ण बोजा आमच्यावर प्रचंड आर्थिक ताण निर्माण करतो..."

"पाच शस्त्रक्रियांनी माझा चेहराच बदलून टाकला..."

शारीब हाश्मीचं कौतुक करताना नसरीन म्हणाली की, "त्यानं माझ्या उपचारांचा संपूर्ण खर्च कोणाकडूनही एक रुपयाही उसना न घेता उचलला आहे. माझ्यासाठी ही गोष्ट अत्यंत मोलाची आहे..." नसरीन पुढे बोलताना म्हणाली की, "हे सर्व काही अगदीच सोपं होतं, असं मी अजिबात म्हणणार नाही. असे काही दिवस असतात, जेव्हा सर्व काही अत्यंत कठीण वाटतं. एक स्त्री म्हणून चेहऱ्याच्या पाच शस्त्रक्रियांतून जाणं, आपला चेहरा इतका बदलताना पाहणं आणि बोलण्यासाठीही संघर्ष करणं... यामुळे मनाला खोलवर वेदना होतात. कधीकधी मी माझे जुने फोटो पाहते आणि विचार करते, "मी पूर्वी किती सुंदर दिसायचे, आणि आता मी किती वेगळी दिसते!"

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mauni Roy Divorce: लग्नाच्या 4 वर्षांनी मोडला बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार, नवऱ्यानं फसवल्याचं समोर; आता खास व्यक्तीसाठी पोस्ट करत म्हणाली...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Embed widget