एक्स्प्लोर

Shanvi Srivastava : दाक्षिणात्य अभिनेत्रीची मराठी सिनेमात एन्ट्री, रानटी सिनेमात दिसणार शान्वी श्रीवास्तव

Shanvi Srivastava : दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव ही रानटी सिनेमातून मराठी सिनेमात पदार्पण करत आहे.

Shanvi Srivastava :  समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ (Ranati) या आगामी मराठी चित्रपटाची  मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून  दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल शान्वी श्रीवास्तव मराठी  रुपेरी  पडद्यावर  पदार्पण करते आहे.  या चित्रपटातील  तिच्या भूमिकेचं  पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं  आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शान्वी श्रीवास्तव हिने  दाक्षिणात्य चित्रपटांच्या दुनियेत चांगलंच नाव कमवलं आहे. शान्वीने 2012  मध्ये तेलुगू चित्रपट लव्हली द्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.‘अड्डा’,‘प्यार में पडीपोयने’,‘भले जोडी’,‘मुफ्ती’,‘चंद्रलेखा’ यासारख्या दाक्षिणात्य  चित्रपटांमध्ये  ती झळकली आहे.                                                           

रानटी सिनेमात दिसणार 'या' भूमिकेत

‘रानटी’ चित्रपटात मैथिली या महत्त्वाच्या भूमिकेत शान्वी दिसणार आहे. ‘रानटी' या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. सोबतच दिग्दर्शक समित कक्कड सारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमालीचा असल्याचा ती  सांगते. या चित्रपटातून तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहस दृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे. 

सिनेमात संजय नार्वेकरांचीही भूमिका मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलीवूडमध्ये ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) आता ‘रानटी’ चित्रपटातून आपल्याला अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. ‘सदा राणे’ नावाच्या खतरनाक खलनायकाची भूमिका ते साकारत आहेत. ‘सदा राणे’ ही अत्यंत क्रूर व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा थरकाप उडवणारी आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shanvi Srivastava (@shanvisri)

ही बातमी वाचा :   

बायकोसोबत करवा चौथ साजरी केल्यामुळे मराठी अभिनेता ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला, 'वैयक्तिक आयुष्यावर कमेंट...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Embed widget