एक्स्प्लोर

Shahrukh Khan King: किंग खानच्या वाढदिवशी फॅन्सना गुडन्यूज; 'किंग'मधील पहिलं गाणं रिलीज, दीपिकाचा भगवा लूक चर्चेत

Shahrukh Khan King Song: शाहरुख खान यांच्या वाढदिवशी ‘किंग’मधील पहिले गाणे ‘तू मिल जाए’ प्रदर्शित.

Shahrukh Khan King First Song: शाहरुख खान (Shahrukh Khan) यांच्या चाहत्यांसाठी यापेक्षा मोठे वाढदिवसाचे सरप्राइज दुसरे काय असू शकते! सुपरस्टारने (Superstar) आपल्या आगामी अ‍ॅक्शन एंटरटेनर ‘किंग’मधील (King) ‘तू मिल जाए’ हे गाणं रिलीज केलं आहे. या गाण्यासाठी संगीत आणि सिनेमाच्या जगातील काही रोमांचक नावे एकत्र आली आहेत. या गाण्यात जागतिक स्तरावरील संगीत सहकार्य पाहायला मिळत असून, अरिजित सिंह (Arijit Singh) यांचा सुरेल आवाज आणि एड शीरनची अनोखी रॅप शैली यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. यासोबतच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण (Dipika Padukone) ही प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडत्या ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक पुन्हा एकदा या गाण्यात पाहायला मिळत आहे.

या म्युझिक व्हिडिओमधून ‘किंग’च्या विश्वाची झलक पाहायला मिळते. व्हिडिओची सुरुवात शाहरुख खान यांच्या दमदार संवादाने होते, “मैं कातिल नहीं आशिक हूं और निशान मेरा माशूका, और वह आशिक ही क्या जो दिल चीर ना दे.” या संवादातून त्यांच्या व्यक्तिरेखेचा स्वभाव आणि चित्रपटाचा मूड लगेचच स्पष्ट होतो. त्यानंतर ऐकायला मिळते एक उत्साही आणि रोमँटिक डान्स ट्रॅक, ज्यामध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजित सिंह आणि जागतिक पॉप सेन्सेशन एड शीरन एकत्र आले आहेत. दोन वेगवेगळ्या संगीतविश्वांना जोडणारा हा एक खास म्युझिकल कोलॅबोरेशन आहे. याशिवाय, मधुबंती बागची यांच्या सुरेल आवाजाने या गाण्याला आणखी खास बनवले आहे.

'किंग' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज, दीपिकाचा हटके अंदाज व्हायरल (Shahrukh Khan King First Song Release Tu mil Jaye)

रोमान्स, अ‍ॅक्शन आणि थरार यांचा अनोखा संगम असलेले हे गाणे ‘किंग’ची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणते. केवळ संगीतापुरते मर्यादित न राहता, हे गाणे चित्रपटातील विविध पैलूंची झलकही दाखवते.

‘तू मिल जाए’ या गाण्यात अनेक प्रतिभावान कलाकार एकत्र आले आहेत. सचिन-जिगर यांनी या गाण्याला संगीत दिले असून, कुमार यांनी गीतलेखन केले आहे. पीयूष-शाजिया यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे, तर एड शीरनने यातील इंग्रजी रॅप लिहिला आहे. म्युझिक व्हिडिओचा शेवट शाहरुख खान यांच्या एका दमदार संवादाने होतो, “इस बार दिल में आग लगी है, अब दुनिया जलाए बिना मानेगा नहीं.” या संवादातून पुन्हा एकदा ‘किंग’च्या व्यक्तिमत्त्वातील रुबाब, तीव्रता आणि प्रभावी अंदाज अधोरेखित होतो.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. आता ‘तू मिल जाए’ या गाण्यातून या दोघांची तीच रोमँटिक केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. गाण्यातील रोमँटिक क्षणांसोबतच अप्रतिम दृश्येही लक्ष वेधून घेतात. अ‍ॅक्शन सीन्स, आकर्षक ट्रान्झिशन्स आणि दमदार संवाद यांमुळे हे गाणे केवळ एक म्युझिक व्हिडिओ न राहता त्यापेक्षा अधिक खास ठरते. त्याचबरोबर, प्रेक्षकांना ‘किंग’च्या भव्य विश्वाची झलकही पाहायला मिळते.

सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मारफ्लिक्स पिक्चर्स यांनी केली आहे. ‘किंग’ हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘तू मिल जाए’ हे गाणे सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. तसेच, या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ झी म्युझिक कंपनी आणि टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Prarthana Behere Father: 'तुम्ही आमचं आभाळ होता, बाबा…'; प्रार्थना बेहेरेची वडिलांसाठी भावूक पोस्ट, वर्षश्राद्धानिमित्त आठवणींना उजाळा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tejashri Pradhan Atharva Sudame: 'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
Rahul Gandhi Riteish Deshmukh Genelia: विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
Gayatri Datar: गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
गायत्री दातार पतीसोबत झाली रोमँटिक, Eiffel Towerसमोर केलं KISS; कॅप्शनने वेधलं लक्ष, PHOTOs
KBC 18: खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार
खिशात 24 रुपये अन् घर सोडलं; महाराष्ट्राचा लेक झाला करोडपती, KBCच्या एका प्रश्नानं नशीब पालटवलं; म्हणाला, आधी आईचे विकलेले दागिने घेणार
Advertisement

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Fire: शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टासमोर गोळीबार अन् कोयत्यानं हल्ला; सपासप वार करून नंबरप्लेट नसलेल्या गाडीवरून पळाले, पोलिसांनी दिली मोठी माहिती, नेमकं काय घडलं?
Laxman Hake on Supriya Sule CM Post: सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
सुप्रिया सुळे भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाल्या तर शरद पवारांच्या राजकारणाची विश्वासार्हता कायमची संपेल: लक्ष्मण हाके
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
Sanjay Raut On Sanjay Shirsat: नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
नाथानी हाइट्स बिल्डिंगच्या 72व्या मजल्यावर बोलावलं; 20 टक्के मागितले, मंत्री संजय शिरसाटांचं नाव घेत संजय राऊतांचा नवा बॉम्ब, नेमकं काय म्हणाले?
Pune Devram Lande: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मनसे कार्यालयात; राज ठाकरेंवरील वक्तव्याप्रकरणी मागितली माफी; प्रतिमेसमोर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले....
Pune Crime News: ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
ठो ठो ठो...कुठे चप्पल, कुठे पिस्तूल, कुठे भरलेलं मॅगजीन; 4 जणांच्या हाती कोयता आणि पाठलाग, पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?
Pune Crime:शेवटच्या घटकेला जखमी तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत राहिला, शिवाजीनगर कोर्टाबाहेरचं भयानक दृश्य
शेवटच्या घटकेला जखमी तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत राहिला, शिवाजीनगर कोर्टाबाहेरचं भयानक दृश्य
Pune Flex: पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; भाजपचेच ‘नेते’ आघाडीवर, पालिकेकडून विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी जाहीर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंसह नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पांडे यादीत
Embed widget