Shahid Kapoors Sister Wedding : शाहिद कपूरची बहिण सना अडकणार लग्नबंधनात; मयंकसोबत बांधणार लग्नगाठ
सना कपूर (Sanah Kapur) ही आज (2 मार्च) मयंक पाहवा (Mayank Pahwa) सोबत लग्नगाठ बांधणार आहे.
Shahid Kapoors Sister Wedding : अभिनेत्री सुप्रिया पाठक (Supriya Pathak) आणि अभिनेता पंकज कपूर (Pankaj Kapur) यांची मुलगी सना कपूर (Sanah Kapur) ही आज (2 मार्च) मयंक पाहवा (Mayank Pahwa) सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सना ही अभिनेता शाहिद कपूरची बहिण आहे. सना आणि मयंक यांचं प्रीवेडींग सेलिब्रेशन काल झालं.
काल सना आणि मयंक यांचा संगीत आणि मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सनाने मेहंदी आणि संगीत सोहळ्यासाठी गुलाबी रंगाचा लेहेंगा आणि गोल्डन क्रॉप टॉप श्रग असा लूक केला होता. सना आणि मयंक यांचा लग्न सोहळा महाबळेश्वर येथे पार पडणार आहे.
View this post on Instagram
विवान शहानं शेअर केला व्हिडीओ
अभिनेता विवान शहानं सनाच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ शेअर केला आहे. विवान हा अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांचा मुलगा आहे. रत्ना आणि सुप्रिया पाठक या दोघी बहिणी आहेत. सनानं शानदार या चित्रपटामध्ये काम केले आहे. या चित्रपटाक सनासोबत शाहिद कपूर आणि आलिया भट यांनी प्रमुख भूमिका साकारली.
संबंधित बातम्या
- Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते, 'हे' आहे कारण
- Ranveer Singh : 'जबरा फॅन'; पाठीवर काढला टॅटू, रणवीर म्हणाला...
- Jhund : झुंड पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावले; म्हणाला, काय जबरदस्त काम केलंय यार...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha