‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
शाहरुख खानसमोर बाकीचे सुपरस्टार फिके पडणार? ‘किंग’बाबत तरण आदर्श यांचं मोठं वक्तव्य चर्चेत!

Shahrukh Khan: शाहरुख खान (Shahrukh Khan) यांचा ‘किंग’ हा चित्रपट (King) यंदा डिसेंबरमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. याचदरम्यान, ज्येष्ठ ट्रेड विश्लेषक तरण आदर्श (Taran Aadarsh) यांनी शाहरुख खान यांचे स्टारडम आणि चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या जोडीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला, शाहरुख खान अभिनीत बहुप्रतीक्षित आणि अॅक्शनने भरलेला ‘किंग’ हा चित्रपट सुपरस्टारच्या नेतृत्वाखालील दमदार कलाकारांच्या संचासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगभरात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर एक भव्य सिनेमॅटिक सोहळा ठरणार असल्याची अपेक्षा आहे.
तरण आदर्श काय म्हणाले?
शाहरुख खान यांच्याबद्दल सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच ज्येष्ठ ट्रेड विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सुपरस्टारचे नाव उत्तम आणि दर्जेदार चित्रपटांची ओळख का बनले आहे, याबद्दल आपले मत मांडले आहे. ‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना तरण आदर्श म्हणाले, “शाहरुख खान यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होईल, त्या दिवशी शाहरुख खान यांची चाहत्यांमधील लोकप्रियता तुम्हाला पाहायला मिळेल.” पुढे त्यांनी या चित्रपटाकडून प्रेक्षकांना कोणत्या अपेक्षा ठेवता येतील, याबद्दलही भाष्य केले. सुपरस्टार शाहरुख खान यांच्यासोबत उत्कृष्ट कलाकृती साकारण्यात पारंगत असलेले सिद्धार्थ आनंद यांची जोडी जमल्यामुळे चित्रपटगृहांमध्ये काहीतरी भव्य आणि शानदार पाहायला मिळणार, याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
किंग नवा विक्रम रचेल?
याबद्दल बोलताना तरण आदर्श म्हणाले,“’किंग’ या चित्रपटासोबत शाहरुख खान यांचे नाव जोडले गेले आहे, हीच स्वतःमध्ये एका चांगल्या चित्रपटाची ओळख आहे. पडद्यावर काहीतरी मोठे आणि भव्य पाहायला मिळणार, हे तुम्हाला माहीत असते. ते सिद्धार्थ आनंद यांच्यासोबत पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. मला माहीत आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक नवा विक्रम प्रस्थापित करेल. प्रेक्षक कोणत्याही अभिनेत्याचे चाहते असले, तरी ते ‘किंग’ पाहण्यासाठी नक्कीच चित्रपटगृहात जातील, याची मला पूर्ण खात्री आहे.” भारतीय चित्रपटसृष्टीला सातत्याने नवी ओळख मिळवून देणाऱ्या शाहरुख खान यांच्या अतुलनीय कारकिर्दीने प्रेक्षकांशी असलेले त्यांचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. त्यांच्या स्टारडमला कोणाचीही तोड नाही, हेच यातून सिद्ध होते. आता ‘किंग’च्या माध्यमातून आणखी एक भव्य आणि शानदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी शाहरुख खान सज्ज झाले आहेत.





















