एक्स्प्लोर

डर नहीं दहशत हूं... ‘किंग’चा फर्स्ट लूक समोर, शाहरुख खानचा जबरदस्त अंदाज; 60 व्या बर्थडेला शेअर केला टीझर

King Title Video Release: सिद्धार्थ आनंदच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि मसालेदार फिल्म मानली जात आहे, जी त्यांच्या अॅक्शन स्टोरीटेलिंगला एका नव्या लेव्हलवर नेणार आहे.

Shahrukh Khan: जगभरात 2 नोव्हेंबर हा दिवस SRK डे म्हणून साजरा केला जातो.सुपरस्टार शाहरुख खान त्याचा 60 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमले आहेत. यंदाचा SRK डे मात्र फॅन्ससाठी अधिक खास ठरला आहे. कारण, शाहरुख खानच्या वाढदिवशी (Shahrukh Khan Birthday) दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्यांच्या बहुचर्चित चित्रपट ‘किंग’चा टायटल रिव्हील व्हिडिओ रिलीज केला आहे. या व्हिडिओत शाहरुखचा दमदार लूक दाखवण्यात आला आहे. ‘पठाण’नंतर सिद्धार्थ आनंद आणि शाहरुख खान यांची ही दुसर एकत्र काम आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होणारा हा सिनेमा 2026 साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (King Title Video Release)

किंग खानचा आगळा वेगळा अवतार(King Title Video Release)

‘किंग’ हा एक स्टायलिश आणि थरारक अॅक्शन एंटरटेनर असणार आहे, जो स्टाइल, करिश्मा आणि थ्रिलचा नवा अनुभव देईल. सिद्धार्थ आनंदच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि मसालेदार फिल्म मानली जात आहे, जी त्यांच्या अॅक्शन स्टोरीटेलिंगला एका नव्या लेव्हलवर नेणार आहे.

शाहरुख खानच्या लूककडे पाहिलं तर तो पूर्णपणे ‘सॉल्ट अँड पेपर’ म्हणजेच ग्रे हेअर लूकमध्ये दिसतोय. कानात बाली, नाकातून वाहणारं रक्त आणि ओठात दाबलेला पत्ता हा सगळा लूक त्याला आणखी इंटेन्स आणि जबरदस्त बनवतो. या अवतारात शाहरुख एकदम भयानक, स्टायलिश आणि रॉ लुकमध्ये दिसतोय, ज्याने फॅन्सना अक्षरशः वेड लावलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Red Chillies Entertainment (@redchilliesent)

‘किंग’चा टायटल रिव्हील म्हणजे शाहरुख खानच्या ओळखीचा, त्यांच्या आयकॉनिक व्यक्तिमत्त्वाचा जल्लोषच आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदकडून हा फॅन्सना दिलेला एक विशेष वाढदिवसाचं  गिफ्ट म्हणावं लागेल. वाढदिवसाच्या दिवशी रिलीज झालेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुखचा चार्मिंग अंदाज, प्रचंड एनर्जी आणि त्याचा दमदार डायलॉग – “सौ देशो में बदनाम, दुनीयाने दिया एकही नाम… किंग!” फॅन्सना अक्षरशः थरारून टाकतो.‘पठाण’नंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ आनंद आणि शाहरुख खानची ही जोडी मोठ्या पडद्यावर धमाका करणार याची खात्री फॅन्सना वाटतेय. ‘किंग’ २०२६ मध्ये रिलीज होणार असून, या सिनेमाची आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Embed widget