एक्स्प्लोर

Savalyachi Janu Savali Serial Track: सारंगनं, सावलीसाठी तिल्लोत्तमावर चढवला आवाज; देवा, सावलीच कनेक्शन नेमकं काय?

Savalyachi Janu Savali Marathi Serial Track : 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सावलीच्या सहगायिका म्हणून काम करण्याबाबत मत घेण्यात येतं, आणि सारंगचं सावलीच्या बाजूनं असलेलं मत निर्णायक ठरतं.

Savalyachi Janu Savali Marathi Serial Track : 'सावळ्याची जणू सावली' (Savalyachi Janu Savali)  मालिका एका रंजनक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनावधानानं आणि कटकारस्थानं रचून सावली आणि सारंगचं लग्न लागलं. पण, तरीसुद्धा गेल्या काही भागांत दोघंही ते नातं निभावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता दोघांचं नातं काहीसं बदलताना दिसणार आहे. सारंग सावलीची बाजू घेत, त्याची आई तिल्लोत्तमावर आवाज चढवतो. सारंग तिल्लोत्तमासोबत सावलीसाठी भांडणार आहे, या विचारानं आता पुढे काय होणार? याची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. 

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सावलीच्या सहगायिका म्हणून काम करण्याबाबत मत घेण्यात येतं, आणि सारंगचं सावलीच्या बाजूनं असलेलं मत निर्णायक ठरतं. त्यामुळे तिलोत्तमाचा राग अनावर होणार आहे. तर सारंग आईला समजावण्याचा प्रयत्न करतो, सारंग सावलीची माफी मागण्यासाठी धडपडतोय. दरम्यान, हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात झाली आहे, पण कुटुंबीयांमध्ये तणाव आहे. सारंग सावलीला एका कॅफेमध्ये नेऊन माफी मागण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तिलोत्तमाला हे समजल्यावर ती कॅफेमध्ये जाऊन वाद घालते. ती सावलीला सारंगच्या आयुष्यातून कायमची निघून जाण्यासाठी कोऱ्या चेकचा प्रस्ताव देते. यावेळी सारंग प्रथमच आईवर आवाज चढवणार आहे. 

मकरसंक्रांतीच्या दिवशी, जगन्नाथ सावलीच्या घरी एका वाईट हेतूने भेट देतो. ज्यामुळे त्याचा आणि सारंगचा मोठा वाद होणार आहे. कुटुंबातील तणाव तेव्हा वाढतो, जेव्हा जयंती आणि सखा सावलीसाठी भेटवस्तू घेऊन येतात. जयंती ठामपणे सांगते की, सावलीनं सारंगच्या खोलीत राहावं. इकडे सारंग सावलीची मनापासून माफी मागतो आणि तिचा विश्वास जिंकतो. त्यानंतर, देवा आणि सावली यांची पहिली भेट होणार आहे. पण त्यांच्यात तात्काळ एक विशेष नातं निर्माण होतं. बोलता बोलता देवाला सावली आपली लहान बहीण असल्यासारखी वाटू लागते, तर सावलीला देवामध्ये एक उबदार आपलेपण जाणवतं. त्या दोघांमध्ये अगदी क्षणात गोड संवाद तयार होतो, जणू नशिबानंच त्यांना एकमेकांसाठी जोडून ठेवलं होतं. 

दरम्यान, काय आहे देवा आणि सावलीच कनेक्शन ? जयंती आणखीन काय गोंधळ घालणार? याची उत्तरं येत्या काही भागांमध्ये मिळणार आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Marathi Play  Me Vs Me: रंगभूमीवर 'मी व्हर्सेस मी'; मराठीतले तीन दिग्गज दिसणार एकत्र, गूढ, थरारक पण तितकंच संवेदनशील मुद्द्यांवर प्रकाश टाकणारं नाटक

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Embed widget