Satyajit Ray 101 Birth Anniversary : 'सत्यजीत रे' चित्रपटांचा जादूगार; ऑस्करबरोबरच 32 पुरस्कारांवर कोरलं नाव, 'हे' पाच चित्रपट नक्की पाहा
‘सत्यजीत रे’(Satyajit Ray) यांची आज (2 मे) 101 वी जयंती आहे.
![Satyajit Ray 101 Birth Anniversary : 'सत्यजीत रे' चित्रपटांचा जादूगार; ऑस्करबरोबरच 32 पुरस्कारांवर कोरलं नाव, 'हे' पाच चित्रपट नक्की पाहा satyajit ray birth anniversary won 32 awards see his these 5 movies Satyajit Ray 101 Birth Anniversary : 'सत्यजीत रे' चित्रपटांचा जादूगार; ऑस्करबरोबरच 32 पुरस्कारांवर कोरलं नाव, 'हे' पाच चित्रपट नक्की पाहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/b8b57986919b41eff8dd298b59f859ef_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Satyajit Ray 101 Birth Anniversary : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते ‘सत्यजीत रे’(Satyajit Ray) यांची आज (2 मे) 101 वी जयंती आहे. सत्यजित रे यांना पद्मश्री, भारतरत्न आणि ऑस्कर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आज अनेक युवा चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट पाहून प्रेरित होतात.
सत्यजीत रे यांना 32 शासकीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना 30 मार्च 1992 रोजी को ‘ऑनररी लाइफटाइम अचीव्हमेंट अवॉर्ड’नं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पाच खास चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात...
1. अपू ट्रॉयोलॉजी- या चित्रपटाला तीन भागांमध्ये तयार करण्यात आलं. पहिला भाग होता पाथेर पांचाली, दुसरा भाग अपराजितो आणि तिसरा भाग द वर्ल्ड ऑफ अपू होता. या सर्व भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामुळे भारतीय चित्रपसृष्टीला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर विशेष ओळख मिळाली.
2. महानगर- या चित्रपटामध्ये सत्यजीत रे यांनी मोठ्या शहरांमधील लोकांची जीवन जगण्याची शैली दाखवली आहे. महिला ऑफिसमधील काम करून घर देखील कशा पद्धतीनं सांभाळतात, हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.
3. चारुलता- महिलांना जाणवणाऱ्या एकटेपणा, या विषयावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे.
4. आगंतुक- हा सत्यजीत रे यांचा शेवटचा चित्रपट आहे. उत्पल दत्त यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटामधील डायलॉग आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
5. शतरंज के खिलाडी– सत्यजीत रे यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकाच हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. 'शतरंज के खिलाडी' या त्यांच्या हिंदी चित्रपटाचे कथानक हे अवधचा शेवटचा सम्राट अली शाह याच्यावर आधारित आहे.
हेही वाचा :
- Baloch : अपरिचित लढ्याची शौर्यगाथा! प्रवीण तरडेंचा 'बलोच' दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- Mahesh Manjrekar : मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती; महेश मांजरेकरांनी केली आगामी सिनेमाची घोषणा
- Satyavan Savitri : गोष्ट सत्यवान-सावित्रीची, प्रेमावरील विश्वासाची! नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)