एक्स्प्लोर

Sankarshan Karhade Emotional Post After Ajit Pawar Death: 'आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतंय...'; अजितदादांच्या आठवणीनं संकर्षण कराडे भावूक

Sankarshan Karhade Emotional Post After Ajit Pawar Death: मराठी अभिनेता संकर्षण कराडे यानं एक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले, असं संकर्षण कराडे म्हणालेले.

Sankarshan Karhade Emotional Post After Ajit Pawar Death: बारामतीत (Baramati News) विमान कोसळून घडलेल्या दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. अजित पवारांच्या (Ajit Pawar) अकाली एग्झिटनं फक्त राजकीय विश्वच नाहीतर, अवघा देश हळहळला आहे. अशातच कलाविश्वातूनही अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अशातच मराठी अभिनेता संकर्षण कराडे यानं एक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.   

मराठमोळा अभिनेता संकर्षण कराडे (Marathi Actor Sankarsan Karade) यानं शोक व्यक्त करत एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं आहे की, "मा. अजित पवार सरांचं जाणं फार दुर्दैवी. काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली की आधार वाटतो. त्यातले अजितदाद पवार हे तसे आधार वाटायचे. आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटत आहे, खूप त्रास होतोय. गंभीर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्यांची शैली कमाल होती. त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले ही भावना मी समजू शकतो. अपघातात त्यांच्यासह प्राण गमावलेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. अजित दादा.. खूप आठवण येत राहील..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sankarshann G Karhade (@sankarshankarhade)

ध्यानी मनी नसताना राजकारणात प्रवेश अन् सर्वांचे 'दादा' झाले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा इथे झाला.  ते आपल्या कार्यकाळात सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहिले.  त्यांनी बी. कॉम या पदवीचं शिक्षण घेतलं. नंतर शेती व्यवसाय सांभाळत अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केला.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत  वित्त, नियोजन, ऊर्जा जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती प्रभावीपणे हाताळली. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वर्तुळातून तसेच सिनेविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत अनेक दिग्गज आले आहेत. राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, महाराष्ट्रातील अनेक कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे आमदार, ज्यात झिशान सिद्दीकी, विश्वजीत कदम, नवाब मलिक आणि अनेक मान्यवर अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले आहेत.  विद्या प्रतिष्ठान इथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोल्हापूर, बारामती, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि इतर ठिकाणांहूनही लोक येत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'भरून न निघणारी पोकळी..' अजित पवारांच्या निधनानंतर रितेश देशमुख हळहळला, भावनिक पोस्ट शेअर करून वाहिली श्रध्दांजली

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget