Sanju Rathod : अंबानींचं निमंत्रण, Fortunerचा प्रवास ते वऱ्हाडींकडून मिळालेली वन्समोअरची दाद; रॉयल सोहळ्यात संजूचं 'गुलाबी साडी' गाणं कसं पोहचलं?
Sanju Rathod : संजू राठोड याने अंबानींच्या लग्नात गायलेल्या गुलाबी साडीची जगभरात चर्चा झाली. याचविषयीचा किस्सा त्याने माझा महाकट्टावर उलगडला आहे.
Sanju Rathod : जगभरात ज्या सोहळ्याची चर्चा झाली तो अंबानींचा सोहळा काही दिवसांपूर्वीच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला जगभरातील दिग्गज मान्यवरांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक आलिशान गोष्टींनी या सोहळ्यात साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण या संपूर्ण सोहळ्यात विशेष ठरलं ते मराठमोळा गायक संजू राठोड याचं 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं. पण हे गाणं अबांनींच्या सोहळ्यापर्यंत कसं पोहचलं हा किस्सा संजू राठोडने (Sanju Rathod) 'माझा महाकट्टावर' (Majha MahaKatta) उलगडला.
अंबानींच्या सोहळ्यात संजू राठोडने त्याचं गुलाबी गाणं सादर केलं. या लग्नसोहळ्यासाठी बरीच दिग्गज मंडळी आली होती. ती सगळी मंडळी या गाण्यावर थिरकली होती. विशेष म्हणजे या सगळ्यांना हे गाणं अगदी तोंडपाठ होतं. त्यामुळे संजूला या सोहळ्यात वन्समोअरची देखील दाद मिळाली.
अंबानींच्या सोहळ्यात संजूचं गुलाबी साडी गाणं कसं पोहचलं?
माझा महाकट्टावर संजूने म्हटलं की, 'मला लग्नात गाण्यासाठीही बरीच आमंत्रणं येत होती. पण मी एकदा मस्करीतच जी स्पार्कला म्हणालो की,अंबानींचं वैगरे आमंत्रण आलं तर मी तयार होईन. त्यानंतर तीन चार दिवसांनी मला मेल आला आणि तो म्हणाला की, आपल्याला अंबानींच्या लग्नाला जायचं आहे. मला वाटलं की,हा मस्करी करतोय माझी. त्याने मग मला मेल दाखवला आणि मी शॉक झालो. तेव्हाही मला वाटलं की, हे फ्रॉड असणार. त्यावेळी बोलणं वैगरे झालं आणि मग आमचं जायचं नक्की झालं.'
'त्यांची गाडी आली आम्हाला घ्यायला. त्यांनी फॉर्च्युनर पाठवली होती. मी जी स्पार्कला म्हटलं की, अजून मोठी गाडी सांगायला हवी होती. आम्ही अगदी ग्रामीण भागातील आयुष्य जगलो आहोत. त्यामुळे तिथून इथे जायचं ही आमच्यासाठी खूप वेगळीच भावना होती. आम्ही जसं तिथे प्रवेश केला तिथे रॅपर किंग बसला होता. मी जी स्पार्कला म्हटलं की, कसं होणार आपलं. तितक्यातच ती मॅनेजर आम्हाला त्याच्याकडे घेऊन गेली आणि म्हणाली की तुमचं गाणं एकत्रच आहे.'
'त्यावेळी मी जी स्पार्कला आमच्या भाषेत म्हटलं की, जी स्पार्क काय करायचं रे माझं डोकचं चालत नाहीये. काही नाही तू फाडून टाक स्टेज. जाऊदे जे होईल ते आपण बघून घेऊ, आपण काही घाबरत नाही. त्यानंतर ज्या दिवशी मी माझा फरफॉर्मन्स होता, त्यादिवशीही खूप छान वाटलं. तिथेही मला वन्समोअर मिळाला. तिथे मराठी गाणी सगळ्यांचं पाठ होतं सगळे जण ते गाणं गुणगुणत होते.'
ही बातमी वाचा :
Jahnavi Killekar : मी खूप गुणी पण..., बिग बॉसच्या घरात जाण्याआधी जान्हवी किल्लेकरने काय म्हटलं?