एक्स्प्लोर

Kalaawati : संजय जाधवची मोठी घोषणा; 'कलावती' सिनेमात अमृता खानविलकरसोबत झळकणार 'हास्यजत्रा' फेम ओंकार भोजने

Kalaawati : संजय जाधवचा 'कलावती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kalaawati Marathi Movie : 'वेड', 'वाळवी' या सिनेमांनी वर्षाच्या सुरुवातीलाच मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. वेगवेगळ्या जॉनरचे मराठी सिनेमे आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच आता रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा असलेल्या संजय जाधवने (Sanjay Jadhav) नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. 'कलावती' (Kalaawati) असे या सिनेमाचे नाव आहे. 

संजय जाधवचा पहिला हॉरर कॉमेडी सिनेमा

संजय जाधवने 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'तू ही रे','लकी', 'चेकमेट', 'खारी बिस्किट', 'ये रे ये रे पैसा', 'तमाशा लाईव्ह' अशा वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. पण आता 'कलावती' या सिनेमाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

तगडी स्टारकास्ट असलेला 'कलावती'

'कलावती' या सिनेमात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, अभिजित चव्हाण, हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे, संजय शेजवळ, नील साळेकर (इन्फ्लूएन्सर) मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाची पटकथा दर्जेदार कलाकृतींचं लेखन करणाऱ्या अभिजित गुरुने लिहिली आहे. तर अमेय खोपकर या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sanjay S Jadhav (@sanjaysjadhav)

'कलावती'चं पोस्टर आऊट! (Kalaawati Poster Out)

'कलावती' या सिनेमात अमृता खानविलकर नक्की कोणती भूमिका साकरणार हे अद्याप समोर आलेलं नाही. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर आऊट आलेलं आहे. या पोस्टरमध्ये अमृता खानविलकरचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे. या पोस्टवरुन 'चंद्रमुखी'नंतर अमृता पुन्हा एकदा लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. 

अमृता खानविलकर आणि ओंकार भोजने जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

कलावती' या सिनेमाच्या माध्यमातून अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कलावती' हा बिग बजेट सिनेमा असून या सिनेमाने ओंकारला चांगली संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे संजय जाधवचा सिनेमा जवळपास चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच एकंदरीतच या भव्य सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा पार पडला असून लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल. 

संबंधित बातम्या

Satarcha Salman : स्वप्नांच्या दुनियेतली भन्नाट माणसं येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'सातारचा सलमान'चा ट्रेलर आऊट

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget