सानिया मिर्झाची 24 तासात दुसरी पोस्ट, आता झेंड्याचा उल्लेख, नेमकं काय म्हणाली?
Sania Mirza instagram post : भारत पाकिस्तानदरम्यान युद्ध सदृश्य परिस्थिती असताना टीम इंडियाची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने 24 तासात दुसऱ्यांना इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून भाष्य केलंय.

Sania Mirza instagram post : भारत आणि पाकिस्तानदरम्यान पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिला आहे. "Diplomacy isn't weakness. Peace isn't a luxury. It's the only way forward..." या ओळी लिहित सानियाने युद्ध नव्हे तर संवाद आणि शांती हाच एकमेव पर्याय असल्याचं ठामपणे सांगितलं.

सानियाने पुढे लिहिलं, "कारण आपण escalation (संकट वाढवणं) काय करतं ते पाहिलं आहे. गाझापासून इस्रायलपर्यंत, पुलवामापासून पहलगामपर्यंत, रशियापासून युक्रेनपर्यंत – झेंडे वेगळे असले तरी दु:ख मात्र सारखंच दिसतं." या वाक्यांतून तिने युद्धाच्या वेदना कोणत्याही देशात सारख्याच असतात, हे अधोरेखित केलं आहे.
सानियाचा हा संदेश सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकदरम्यान तणाव वाढलेला असताना सानियाने संयमित आणि मानवतेचा विचार अनेकांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे.
सानिया मिर्झा ही भारतीय टेनिसमध्ये महत्त्वाची ओळख असून ती पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकची घटस्फोटीत पत्नी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक वक्तव्याकडे दोन्ही देशांमध्ये लक्ष दिलं जातं. युद्ध नव्हे, संवाद आणि समजूतदारपणा हाच खरा मार्ग आहे, हे सानियाने पुन्हा एकदा आपल्या शब्दांतून मांडलं आहे.
सानिया मिर्झाने पोस्टमध्ये काय काय म्हटलंय?
शांतता ही प्रत्येकाची निवड असली पाहिजे. राजनैतिक संवाद म्हणजे कमजोरी नाही,शांती म्हणजे चैनीची गोष्ट नाही, ती प्रत्येकालाच हवी असते. तीच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. कारण आपण पाहिलंय की संघर्ष कुठे नेतो: गाझापासून इस्रायलपर्यंत, पुलवामापासून पहलगामपर्यंत, रशियापासून युक्रेनपर्यंत ....
दरम्यान, यापूर्वीच्या पोस्टमध्ये भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातील दोन महिला अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ऑपरेशन सिंदूरबाबत (Operation Sindoor) सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) विषयी माहिती दिली होती. सानिया मिर्झा हिने दोन महिला अधिकाऱ्यांचा पत्रकार परिषद घेतानाचा फोटो शेअर केलाय. सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने या पोस्टला शेअर करून महिला अधिकाऱ्यांच्या योगदानाचे समर्थन केले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या























