एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu Birthday: चार वर्षांत 4 फिल्म्स, 1 सीरिज; पण सर्वच्या सर्व सुपरफ्लॉप, तरीसुद्धा कोट्यवधी कमावतेय समंथा, नेटवर्थ किती?

Samantha Ruth Prabhu Birthday: चार वर्षांपासून हिटच्या प्रतिक्षेत असणारी समंथा रूथ प्रभू तिच्या नेटवर्थच्या बाबतीत मात्र अव्वल आहे. सततच्या तिच्या फ्लॉपशोनंतरही समंथानं दुप्पट कमाई केली आहे.

Samantha Ruth Prabhu Net Worth: 'पुष्पा' (Pushpa) जेवढा अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) धमाकेदार अभिनयामुळे चालला, तेवढाच एका आयटम सॉन्गमुळे (Item Song) हिट झाला, असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. 'पुष्पा'मधलं ऊ अंटावा वा... हे गाणं ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर सामंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) येते. किलर डान्स, क्लासी अदांसह समंथाच्या (Samantha) या आयटम सॉन्गनं 'पुष्पा'ला चार चाँद लावले. पण, याचा अर्थ असा नाही की, या गाण्यामुळे समंथाला स्टारडम मिळालं. कारण, त्यापूर्वीपासूनच समंथा साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेत्रींच्या (Superstar Actress In South Industry) यादीत अव्वल स्थानी होती. पण, या गाण्यानंतर समंथाच्या स्टारडममध्ये कमालीची वाढ झाली.  

समंथा प्रोफेशनल लाईफमध्ये जेवढी सक्सेसफुल आहे, तेवढाच वैयक्तिक आयुष्यात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पती नागा चैतन्यसोबत घटस्फोट, गंभीर आजार आणि आता अनेक फ्लॉप प्रोजेक्ट्स, समंथानं बरंच काही पाहिलं. पण, एकापाठोपाठ एक फ्लॉपनंतरही समंथाच्या कमाईत काही घट झालेली नाही. उलट तिची संपत्ती खूप वाढली आहे. समंथाच्या प्रोजेक्ट्सवर नजर टाकली तर, गेल्या 4 वर्षांत समंथानं 4 फ्लॉप चित्रपट आणि एक फ्लॉप वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. पण, तरीसुद्धा तिची संपत्ती खूप वाढली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथा रूथ प्रभू हिचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी तामिळनाडूतील मद्रास मध्ये झाला. समंथा आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. कॉमर्समध्ये डिग्री घेतल्यानंतर, तिनं 2010 मध्ये Ye Maaya Chesave या तेलुगू चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर मात्र, तिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही. समंथासाठी प्रोजेक्ट्स रांग लावून उभे असतात, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 

समंथा, नागाचं लव्ह मॅरेज, लग्न अन् घटस्फोट

ज्या वर्षी समंथाची कारकीर्द सुरू झाली, त्याच वर्षी तिचं आणि नागा चैतन्यच्या रिलेशनच्या चर्चा रंगू लागल्या. खरं तर, तिच्या पहिल्या चित्रपटात, नागा चैतन्य देखील तिच्यासोबत पडद्यावर झळकला होता. दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं आणि बऱ्याच काळानंतर 2017 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न उरकलं. लग्नानंतर ती 'सामंथा अक्किनेनी' झाली. पण 2021 मध्ये जेव्हा तिनं तिच्या सोशल मीडिया हँडलवरुन तिच्या नावापुढचं 'अक्किनेनी' आडनाव हटवलं, तेव्हा चाहत्यांना शंका आली. काही दिवसांतच चाहत्यांची शंका सत्यात उतरली. समंथा आणि नागा दोघांनी घटस्फोट घेऊन आपल्या नात्याचा दी एन्ड केला.  

समंथाला आजारानं ग्रासलं 

घटस्फोटानंतर, नागा चैतन्यनं शोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. पण, इथे समंथा आजाराशी झुंजत होती. त्याला मायोसिटिस (Myositis) नावाचा ऑटोइम्यून आजार आहे. ते शरीराच्या इम्यून सिस्टमद्वारे स्नायूंवर हल्ला करते, ज्यामुळे शरीरात सूज आणि अशक्तपणा येतो. गेल्या वर्षी तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, कारण तिचे वडील जोसेफ प्रभू यांचं निधन झालं. पण समंथानं सर्व संकटांना धैर्यानं आणि शौर्यानं तोंड दिलं.

स्वतःला सावरलं, खंबीरपणे पुढचं पाऊल टाकलं

समंथानं अनेक फ्लॉप प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. तमिळ, तेलगू, हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. तिनं 2011 मध्ये 'एक दीवाना था'मध्ये कॅमियो केला. 2021 मध्ये मनोज बाजपेयींची वेब सीरिज 'द फैमिली मॅन 2'मध्ये राजीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याच वर्षी समंथानं Pushpa: The Rise मध्ये 'ऊ अंटावा वा...' आयटम सॉन्ग केलं आणि सर्वांच्या गळ्यातील ताईत बनली. 

पुन्हा करिअरला लागलं ग्रहण

पण यानंतर, 2022 पासून आतापर्यंत, सामंथाचं नाणं काही चाललं नाही. चार वर्षांत तिचे चार चित्रपट आले, पण तेकाही चालले नाहीत. यामध्ये काथुवाकुला रेंदू काधल, यशोदा, शकुंतलम आणि 'कुशी' यांचा समावेश आहे. त्यासोबतच तिची 'सिटाडेल: हनी बनी' ही वेब सिरीजही प्रेक्षकांना फारशी आवडली नाही. अमेझॉन प्राईम व्हिडीओनं माघार घेतली आहे आणि त्याचा पुढील सीझन प्रदर्शित होणार नाही. 

प्रोजेक्ट्स फ्लॉप ठरूनही समंथाची कमाई दुप्पट 

समंथाचं नेटवर्थ किती? तुम्हाला माहितीय का? प्रोजेक्ट्स फ्लॉप ठरले असले तरीसुद्धा समंथानं कमाईच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा एका चित्रपटासाठी 3 ते 5 कोटी रुपये घेते. 2025 मध्ये किती एकूण संपत्ती 101 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की, तिनं सुमारे 250 कोटी रुपयांची पोटगी नाकारली, नाहीतरी तिच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली असती. 

दरम्यान, सामंथाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर, तिची पुढची वेब सिरीज 'रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम' (Rakt Brahmand: The Bloody Kingdom) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अभिनयाव्यतिरिक्त, ती आता निर्माती देखील होणार आहे. निर्माती म्हणून तिच्या पहिल्या चित्रपटाचं नाव शुभम आहे. त्यात तिचा एक छोटासा रोलही असेल.  Maa Inti Bangaram मध्येही ती दिसणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

सुकेश चंद्रशेखरवर बनणार वेब सीरिज; OTT प्‍लेटफॉर्मची जॅकलीन फर्नांडिसला ऑफर, दोघांच्या नात्याचं सत्य उलगडणार

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget