एक्स्प्लोर

सलमान खानच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनावर संकट, खलनायकाच्या निधनानं सगळंच विस्कटलं, कधी होणार रिलीज?

Salman Khan Film as Shoot Remains Incomplete: सलमान खानच्या मातृभूमीचं शुटिंग अद्याप अपूर्ण. चित्रपट कधी रिलीज होणार?

Salman Khan Film: भाईजान सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' यामुळे चर्चेत आहे.  या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  परंतु, या चित्रपटाला सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपूर्ण चित्रीकरणामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लाबंणीवर पडले होते.  आता दिवंगत अभिनेता - गायक प्रशांत तमांगमुळे या चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला या चित्रपटाच्या शीर्षकावरुन वाद सुरु होता. नंतर या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख  बदलण्यात आली. आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख आणखी लांबणीवर पडणार असल्याचं बोललं जात आहे.  

सुरुवातीला सलमान खानच्या आगामी चित्रपटाचं नाव 'बॅटल ऑफ गलवान' ठेवण्यात आलं होतं. परंतु, या चित्रपटाच्या शीर्षकावरुन बरीच चर्चा झाली. शीर्षक वादग्रस्त ठरत असल्यामुळे, 'बॅटल ऑफ गलवान' बदलून 'मातृभूमी: मे वॉर  रेस्ट इन पीस' असे चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले. दरम्यान, हा चित्रपट 17 एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता.  पण आता प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात येणार आहे.  प्रशांत तमांग हा या चित्रपटात खलनायिकाची भूमिका साकारणार होता. परंतु,  काही पटकथेतील बदल आणि प्रशांतच्या आकस्मिक मृत्यूमुळे पु्न्हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी फिल्ममेकर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, फिल्ममेकर्सना या चित्रपटाच्या वेळापत्रकात बदल करावा लागत आहे.  इंडियन आयडॉल 3चा विजेता प्रशांत तमांगला या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी निवडण्यात आले होते.  त्याने चित्रपटातील काही दृश्यांसाठी चित्रीकऱणही केल होते.   दरम्यान, प्रशांतचे जानेवारीत निधन झाले. त्यामुळे चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही.  काही महत्त्वपूर्ण चित्रपटांचे शुटिंग बाकी आहे. प्रशांत आपल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करणार होता, पण त्याच्या मृत्यूमुळे शुटिंग अर्धवट राहिले. 

रिपोर्ट्सनुसार, मातृभूमीची टीम आता चित्रपट पूर्ण करण्यासाठी इतर पर्यायांचा शोध घेत आहे. माहितीनुसार, उर्वरित दृश्यांचे शुटिंग पूर्ण करण्यासाठी टीम एआय आणि व्हिएफएक्सचा वापर करण्याचा विचार करत आहेत. परंतु, यासाठी प्रथम टीमला तमांग कुटुंबाकडून परवानगी घ्यावी लागेल. 

मातृभूमी चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही.  त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निर्माते महिन्याच्या अखेरीस अंतिम निर्णय घेतील, जेणेकरुन पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू करता येईल. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.  हा चित्रपट 15 ऑगस्ट या तारखेच्या आसपास प्रदर्शित होईल, असा अंदाज आहे. हा चित्रपट प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget