एक्स्प्लोर
Advertisement
Salman Khan | 'इधर सब बिकता है...' लॉकडाऊन काळात सलमान आणणार नवा शो
चेहरा आणि आपला ब्रॅंड कसा विकायचा हे सलमानला बरोबर कळलं आहे. त्याच्या या नव्या शोवरही त्याच्या चहत्यांच्या उड्या पडतील यात शंका नाही. सिनेमातला हिरो रोजच्या जगण्यात काय करतो. कसा जगतो हे लोकांना हवंच असणार आहे. इथे तर सलमानचं रोजचं जगणं दिसेल.
मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा तो तिथे होता. त्यामुळे खरंतर तो तिथे अडकला. पण तो काही एकटा नव्हता त्याच्यासोबत लुलिया वंतुर, जॅकलिन फर्नांडिस आणि त्याचे काही कुटुंबिय होते. त्यामुळे तिथं त्याचं तसं बरं चाललं होतं. पुढे चौथा लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बांद्र्याला गेला. वडिलांना भेटला आणि पुन्हा पनवेलच्या फार्म हाऊसवर परत आला. खरंतर त्याने असं का केलं असावं हा प्रश्न आहेच. तर त्याचं उत्तर आता आलं आहे. सलमान त्याचा नवा टीव्ही शो घेऊन येतोय. या शोचं नाव आहे हाऊस ऑफ भाईजान्ज.
यापूर्वी सलमान बिग बॉसमध्ये दिसला होता. छोट्या पडद्यावर त्याची ती एंट्री पाहायला लाखो चाहते टीव्हीसमोर बसायचे. त्यानंतर आता तो त्याचाच शो घेऊन येतोय. सध्या कलर्स वाहीनीवर हा नवा शो येणार असं वृत्त आहे. सलमान जे करेल त्यावर त्याच्या चाहत्यांच्या उड्या पडतात. स्पॉन्सर्स येतात. गेले तीन महिने सामान्य माणसासहं सगळे कलाकार घरी बसले असताना भाईजाननं मात्र एक दोन नव्हे तर चक्क तीन गाणी आणली. एक कोरोनाचं होतं. दुसरं जॅकलिनसोबतचं सिंगल होतं तर तिसरं ईदला त्याने त्याच्या चाहत्यांसाठी आणलं. त्याला अमाप हिटस मिळाले हे नव्यानं सांगायला नको. त्याच्या तीन गाण्यांनाही वाढती पसंती आहे.
कोरोनावरचं त्याचं आलेलं पहिलं गाणं. त्याला तब्बल एक कोटीवर लोकांनी पाहिलं. दुसरं गाणं होतं जॅकलिनसोबतचं तेरे बिना.. या गाण्याला दोन कोटींवर व्ह्यू होते. तर तिसरं गाणं होतं भाई भाई.. या गाण्याला तीन कोटीवर हिट्स मिळाले आहेत. त्याची ही कोटींना वाढती लोकप्रियता पाहून त्याच्या सोबत सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीने टायप केला आणि फ्रेश हा सॅनिटायझर बाजारात आला.
आता त्या पलिकडे सलमान खानने उडी मारली आहे. आता तो चक्क हाऊस ऑफ भाईजान्ज असा शो आणतो आहे. यात पनवेलमध्ये लॉकडाऊन काळातला त्याचं रोजचं जगणं उलडणार आहे. हा शो कधीपासून येणार.. त्याची वेळ काय असेल हे अद्याप निश्चित नाही. पण या शोमध्ये सलमान तर असेलच,. शिवाय त्याला वाटलं तर यात जॅकलिन फर्नांडिस, लुलिया वंतुरही याही येऊ शकतील. त्यामुळे या शोमध्ये आयता ग्लॅमर कोशंट अॅड होईल. या शोसाठी त्याने भली मोठी रक्कम घेतल्याचं कळतं. पण ती कळलेली नाही. चेहरा आणि आपला ब्रॅंड कसा विकायचा हे सलमानला बरोबर कळलं आहे. त्याच्या या शोवरही त्याच्या चहत्यांच्या उड्या पडतील यात शंका नाही. कारण सिनेमातला हिरो रोजच्या जगण्यात काय करतो.. कसा जगतो हे लोकांना हवंच असणार आहे. इथे तर सलमानचं रोजचं जगणं दिसेल. मग ते हिट होईल यात शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement