Salman Khan House: धक्कादायक! सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक, मध्यरात्री अज्ञात महिला थेट घुसली घरात, नेमकं काय घडलं?
Salman Khan House: अभिनेता सलमान खानच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास एक महिला थेट घरात घुसली. घराभोवती असलेला शेकडो सुरक्षरक्षकांचा वेढा भेदून महिला थेट घरात घुसल्यामुळे खळबळ.

Salman Khan House: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी घालून हत्या करण्यात आल्यानंतर बिष्णोई गँगनं सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासूनच सलमान खान सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. सलमान जिथे जातो, तिथे सलमानभोवती सुरक्षारक्षकांचा वेढा दिसतो. एवढंच काय तर, सलमान खानच्या घराभोवतीही मोठी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पण, ही सुरक्षा भेदत एका महिलेनं थेट सलमान खानच्या घरात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. याचं सीसीटीव्ही समोर आलं आहे.
19 मे 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक महिला थेट अभिनेता सलमान खानच्या घरात घुसली. सलमान खानच्या घराभोवती असणारा सुरक्षारक्षकांचा वेढा भेदत महिला थेट सलमान खानच्या दारापर्यंत पोहोचली. सदर महिला ही खारची राहणारी असून तिचं नाव इशा छाब्रा आहे. सलमान खानच्या घराभोवती असलेली सिक्युरिटी तोडून या महिलेनं बिल्डिंगच्या लिफ्टमधून चक्क सलमान खानच्या घरात प्रवेश केला.
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकांनी यावेळी महिलेला तात्काळ ताब्यात घेतलं आणि वांद्रे पोलिसांचा ताब्यात दिलं. सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून वांद्रे पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अटक करण्यात आलेली महिला आरोपी खार पश्चिम परिसरामध्ये राहणारी आहे. महिला नेमकी सलमान खानच्या घरात का घुसली? सलमान खानला मारण्याचा काही उद्देश होता का? या संदर्भात पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.



















