Salman Khan Flopped Badly in Hollywood: सलमान खानच्या आयुष्यातली सुपरफ्लॉप फिल्म; हॉलिवूडची हिरोईन असूनही आपटला चित्रपट, 17 कोटींचं नुकसान, दिग्दर्शकानं इंडस्ट्री सोडली
Salman Khan Flopped Movie : सलमान खानच्या कारकीर्दीतील सर्वात सुपरफ्लॉप फिल्म; हॉलिवूडची अभिनेत्रीही वाचवू शकली नाही चित्रपट, दिग्दर्शकानं तर इंडस्ट्रीच सोडली.
Salman Khan Flopped Badly in Hollywood : बॉलिवूडचा (Bollywood) दबंग सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक नाव. सलमान खानचा (Salman Khan) प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. भाईजानच्या चित्रपटाची त्याचे चाहते आवर्जुन वाट पाहात असतात. पण, तुम्हाला माहितीय का? बॉक्स आफिसवर कायम सुपरहीट ठरणाऱ्या सलमान खानला अनेकदा अपयशाचाही सामना करावा लागला आहे. बॉलिवूडच्या सुपरस्टारचे (Bollywood Superstar) काही चित्रपट एवढे आपटलेत की, निर्मात्यांना त्यामुळे कोट्यवधींच्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे. 17 वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो त्याच्या एकूण बजेटच्या अर्धही भांडवल गोळा करू शकला नाही. यामुळे निर्मात्यांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं.
17 कोटींचं नुकसान
सलमान खानच्या या चित्रपटाचं नाव मेरीगोल्ड (Marigold). हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री एली लार्टर, हेलेन, नंदना सेन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. सलमान खानच्या या चित्रपटाबद्दल अनेकांना माहितीही नसेल, कारण तो कधी आला आणि कधी गेला हे कोणालाही माहिती नव्हतं. 19 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या 'मेरीगोल्ड'नं केवळ 2 कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटामुळे निर्मात्यांना 17 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. 2007 मध्ये 17 कोटी रुपयांचं नुकसान म्हणजे, खूप मोठी गोष्ट होती.
सलमान खानच्या मेरीगोल्डचं कथानक सुपरफ्लॉप ठरलं...
सलमान खानच्या मेरीगोल्ड चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, ही एका अमेरिकन अभिनेत्रीची कहाणी होती, जी एका चित्रपटात एका छोट्या भूमिकेसाठी मुंबईत येते. मुंबईत आल्यानंतर ती एका कोरिओग्राफरच्या प्रेमात पडते. हा एक रोमँटिक चित्रपट होता, पण लोकांना तितकं इम्प्रेस करू शकला नाही.
दरम्यान, सलमान खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर, सलमान खान सध्या आपला आगामी चित्रपट सिकंदरच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. सिकंदरमध्ये सलमान खानसोबत रश्मिका मंदाना लीडरोलमध्ये दिसणार आहे. ही फिल्म यावर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त सलमानचं इतरही प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. सलमानच्या फिल्मची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :