Bharti Singh,Salman Khan : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह  (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa)यांच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचं आगमन झालं. भारतीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ती आई झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. तिनं, इट् अ बॉय अशी पोस्ट शेअर तेली होती. अनेक सेलिब्रिटींनी हर्ष आणि भारतीला शुभेच्छा दिल्या. सध्या सलमान खान (Salman Khan) चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान भारतीला प्रॉमिस करताना दिसत आहे.

  


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान, भारती आणि हर्ष हे बिग बॉस-15 च्या सेटवर दिसत आहे. बिग बॉस -15 मध्ये हर्ष आणि भारती हे हुनरबाज या त्यांच्या कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. तेव्हा भारतीनं सलमानला तिच्या होणाऱ्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याची विनंती केली होती.






भारती म्हणाली होती की, 'करण जोहरनं तिच्या मुलाला लाँच करायला नकार दिला. तर तु माझ्या मुलाला लाँच करशील का?' भारतीच्या या प्रश्नाला सलमाननं उत्तर दिलं. तो म्हणाला, 'नक्कीच मी तुझ्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करेल. ' आता सलमाननं भारतीला दिलेलं प्रोमीस तो पूर्ण करेल का? याची वाट प्रेक्षक पाहात आहेत. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha