Mumbai Crime News : चोरीसाठी करण्यासाठी अपराधी अनोखी शक्कल लढलताना पाहायला मिळतात. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरातील एटीएममध्ये चोरी करण्याची आरोपींची शक्कल फसल्याने पोलिसांनी त्यांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपी एटीएममध्ये कॅश लोडच्या बहाण्याने कंपनीची 77 लाखांची फसवणूक केली. या घटनेचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून एटीएम सेंटरही पेटवून दिलं. या प्रकरणी गोरेगाव पूर्व वनराई पोलिसांनी एसबीआय एटीएम सेंटर लुटणाऱ्या आणि पुरावे नष्ट करणाऱ्या दोन कॅश लोड करणाऱ्यांना अटक केली आहे. 


वनराई पोलिसांच्या तपासादरम्यान एटीएममध्ये लावलेल्या अग्निरोधक बॉक्समुळे या हे प्रकरण उघड झाले. त्यानंतर एटीएममध्ये कॅश लोड करणाऱ्यांना अटक करून दोघांनाही 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


चोरी लपवण्यासाठी लावली आग
गोरेगाव पूर्व आरपीएफ सेंटरमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये अचानक आग लागल्याची माहिती वनराई पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यात यश मिळवले. मात्र, ही आग म्हणजे चोरी लपवण्यासाठी केलेला एक कट होता.


कशी घडली घटना?
एटीएम कॅश लोडर ऋतिक यादव (19) आणि प्रवीण पेणकाळकर (35) या दोघांनी 10 दिवसांपूर्वी एटीएम बंद आणि एटीएममधून पैसे न मिळाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर दोघांनीही कंपनीच्या मुख्य कार्यालयातून एटीएमचा पासवर्ड घेऊन आठवडाभरापूर्वी कंपनीचा विश्वासघात करून एटीएममधून 77 लाख रुपये लंपास केले. पोलिसांची अटक टाळण्यासाठी आणि चोरी लपवण्यासाठी दोघांनी कट रचून एटीएम मशीनला आग लावली.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha