एक्स्प्लोर

Arbaj Shaikh Solapur Hospital Allegations: 'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया

Solapur Hospital on Arbaz Shaikh Allegations: अरबाज शेखच्या आरोपांवर सोलापुरातील हॉस्पिटल प्रशासनाची पहिली प्रतिक्रिया.

Sairat Fame Arbaz Shaikh: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट' (Sairaat) या सिनेमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच त्याच्या वडिलांना गंभीर आजारामुळे सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या वडिलांवर उपचार सुरु असताना त्याच्याकडून औषधं  मागवण्यात आली होती.   पण रुग्णालयात (Solapur hospital) कशा पद्धतीने लूट होते,  हे त्यानं आपल्या व्हिडीओतून सांगितलं. रुग्णालयातील मेडिकलमधून औषध घेणं बंधनकारक नसतानाही,  रुग्णालयाच्या एकाच मेडीकलमधून औषधं घेण्यासाठी कशी जबरदस्ती केली जाते, हे त्यानं आपल्या व्हिडीओतून सांगितलं. यावेळी अरबाज भावुक झाला असल्याचं पाहायला मिळालं.  अभिनेत्याने व्हिडीओतून आर्थिक मदतीसाठीही आवाहन केले आहे. दरम्यान अरबाजने व्हिडीओतून केलेल्या आरोपांवर रुग्णालयाचे प्रमुख  डॉ. अमजद अली सय्यद यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

अरबाज शेखच्या आरोपांवर हॉस्पिटल  प्रशासनाची बाजू समोर (Sairat Fame Arbaz Shaikh on Nobel hospital)

सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याने सोलापुरातील  नोबल हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले होते. त्यानं व्हिडीओ शेअर करुन आर्थिक लूट होत असल्याचा आरोप केला. दरम्यान, अरबाजने केलेल्या गंभीर आरोपांनंतर हॉस्पिटल प्रशासनाची बाजू समोर आली आहे. अभिनेता अरबाज शेख याने हॉस्पिटलवर केलेले आरोप चुकीचे असल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे.  'आम्ही कोणतीही चूक केलेली नाही', असं देखील हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे. 

सोलापुरातील नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजद अली खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून आपली बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, 'अरबाज शेख किंवा कोणत्याही रुग्णाला औषधं घेण्यासाठी कोणतेही बंधन घातलेले नव्हते.  अरबाज यांच्या वडिलांना  न्युरो संदर्भातील आजार होता, त्यामुळे त्यांना आधीच खर्चाची कल्पना दिलेली होती', असं त्यांनी स्पष्ट केलं.  'मात्र त्यानंतर देखील त्याने हा व्हिडीओ का केला? याची कल्पना आम्हाला नाही, पण आम्ही कोणतीही चूक केलेली नाही', असं त्यांनी स्पष्ट केलं.

अरबाज शेख याने आपल्या व्हिडीओत नेमकं काय म्हटलं?

'माझ्या पप्पांना ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापुरातील एका रुग्णालयात अॅडमिट केलं होतं. नंतर हृदयाचा प्रॉब्लेम झाला  म्हणून नोबल हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं.  पण या हॉस्पिटलचा मला सर्वात घाण अनुभव आला होता. सर्वात आधी 10 हजार रुपये डिपॉझिट भरले. नंतर मला गोळ्यांची चिठ्ठी दिली.  त्यांनी मला, हॉस्पिटलच्या मेडीकलमधून गोळ्या आणि इंजेक्शन घ्यावे लागतील, असं सांगितलं. ते सर्व औषधांची किंमत 40 हजारांहून अधिक किंमतीची होती'.

'त्या गोळ्या जर मी बाहेरुन घेतले तर, मला अर्ध्याहून कमी किमतीत मिळू शकतात. पण इथे एवढी लूट होतेय. माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचं आहे.  मला त्यांना या हॉस्पिटलमधून शिफ्ट करावं लागेल', असं म्हणत अरबाज भावुक झाला. यावेळी त्याने आर्थिक मदतीसाठीही विनंती केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वेलकम टू द जंगल'ची बॉक्स ऑफिसवर हवा, 2 कोटी कमावताच बजेट वसूल; कॉमेडी सिनेमाने किती कमावले?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Box office collection: 2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
2 महिन्यांत फक्त 4 हॉलिवूडपटांचा बॉक्स ऑफिसवर कब्जा; बॉलीवूड-साऊथच्या बड्या चित्रपटांची वाट अडवली 
Salman Khan and Sanjay Dutt: ...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
...I Love You Baba; सलमान खानने जिवलग मित्रासोबतचा फोटो केला शेअर, घट्ट मिठी मारताना दोघेही भावुक, नेटकरी म्हणाले...
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
OTT psychological Thriller: IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Embed widget