Marathi Actor : 'सैराट' फेम अभिनेत्याचं नवं पाऊल, स्वत:च्या नव्या व्यवसायाची पुण्यात केली सुरुवात
Marathi Actor : सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याने पुण्यात स्वत:चा कॅफे सुरु केल आहे. त्याच्या या कॅफेसाठी त्याच्या मित्र मैत्रिणींनी देखील त्याला शुभेच्छा दिल्यात.
![Marathi Actor : 'सैराट' फेम अभिनेत्याचं नवं पाऊल, स्वत:च्या नव्या व्यवसायाची पुण्यात केली सुरुवात Sairat actor arbaj shaikh started his new business by opning a cafe in pune Maharashtra detail marathi news Marathi Actor : 'सैराट' फेम अभिनेत्याचं नवं पाऊल, स्वत:च्या नव्या व्यवसायाची पुण्यात केली सुरुवात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/11/846f1527a27bb8a886fa7da04d5b60101707632159556720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Actor arbaj shaikh started his new business : काही वर्षांपूर्वी सैराट (Sairat) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याने सिनेमागृहात अधिराज्य केलं. शंभर कोटींच्या घरात जाणारा सैराट हा पहिला मराठी सिनेमा ठरला. या सिनेमातून अभिनेत्यांची नवलाईने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आर्ची आणि परश्याची जोडी देखील सुपरहिट ठरली होती. आर्ची आणि परश्यसोबत त्यांचे दोन मित्र सल्या आणि लंगड्या देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. या सिनेमाची गोष्ट, त्यातले कलाकार यामुळे ही सिनेमा अगदी जवळचा ठरला. अभिनेत्री रिंकु राजगुरु (Rinku Rajguru), अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar), त्यांचे सहकलाकार अभिनेता अरबाज शेख आणि तानाजी गालगुंडे यांनी त्यांची ओळख या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माण केली.
या सिनेमातील स्टारकास्ट असलेल्या आर्ची, परश्या, लंगड्या आणि सल्या यांच्यात आजही तितकीच चांगली मैत्री आहे. तसेच ते एकमेकांच्या यशामध्ये आणि त्यांच्या नव्या वाटचालीमध्येही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या सिनेमाच्या माध्यामातून या चौघांच्याही आयुष्याला एक नवी दिशा मिळाली, असं त्यांच्याकडूनही सातत्याने सांगण्यात येत आहे. त्यातच आता यातील एका अभिनेत्याने स्वत:चा नवा व्यवसाय सुरु केला आहे.
'या' अभिनेत्याने सुरु केलं नवं कॅफे
या सिनेमातील एका कलाकाराने नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. परश्याचा मित्र सल्या म्हणजे अभिनेता अरबाज शेख याने नव्या व्यवसायात पदार्पण केलं आहे. पुण्यात त्याने स्वत:चं नवं कॅफे सुरु केलं. अरबाजने सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याने त्याच्या या नव्या व्यवसायाबद्दल माहिती दिली आहे. तसेच अभिनेत्री रिंकु राजगुरु हीने देखील त्याच्या या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बेक बडीज असं त्याच्या कॅफेचं नाव असून पुण्यातील सिंहगड रोडवर त्याचं हे नवीन कॅफे आहे. आज म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी त्याच्या या कॅफेचं उद्घाटन होणार आहे.
View this post on Instagram
सिनेसृष्टीत सक्रिय
सैराटच्या यशानंतर अरबाजला आणखी नवे सिनेमेही मिळाले. तो गस्त, झुंड, फ्री हिट दणका या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच आता संघर्ष योद्धा मनोज जरांगे या सिनेमात देखील झळकणार आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)