एक्स्प्लोर

Saif Ali Khan : मोठी बातमी, सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश, एकाला ताब्यात घेतलं

Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावरील हल्ला प्रकरणात एका संशयीत व्यक्तीला  पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेला व्यक्ती तोच आहे का याचा शोध पोलिसांकडून घेतला जाईल. जवळपास अनेक सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्तीच आरोपी आहे का हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती आहे.  मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात तपासासाठी 20 पथकं तयार केली होती. 

अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारीला मध्यरात्री सव्वा दोन ते अडीच्या दरम्यान एका व्यक्तीनं हल्ला केला होता. त्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला होता. मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी संशयित व्यक्तीच्या शोधासाठी अनेक पथकं तयार केली होती. मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत वांद्रे पोलीस स्टेशनला नेलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती हाच आहे का याचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जाणार आहे. 

सैफ अली खान याच्यावरी हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी अनेकांची चौकशी केली होती. वांद्रे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशीसाठी बोलावलं आहे. फरार आरोपीसंदर्भात नवे धागेदोरे मुंबई पोलिसांना मिळतात का हे स्पष्ट होईल.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडे फोन नसल्याची माहिती आहे. जर एखादा फोन असता तर तो नंबर ट्रेस करुन त्याच्यापर्यंत पोहोचता आलं असतं. हा जर सराईत गुन्हेगार होता तर काही अन्य गुन्ह्यांची उकल होऊ शकते. काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान याच्या मन्नत घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मन्नतची भिंत ऊंच असल्यानं त्यासोबत संरक्षक जाळी असल्यानं एका व्यक्तीला आत घुसण्यामध्ये अपयश आलं होतं, अशी माहिती आहे. 

पोलिसांवर याप्रकरणात दबाव आहे. वांद्रे पोलीस स्टेशनच्या परिसरात एकामागोमाग घटना घडल्यानं दबाव वाढला होता. एका अभिनेत्याच्या घरी जाऊन हल्ला होत असल्यानं पोलिसांवरील दबाव वाढला होता. आता मुंबई पोलिसांना यश आलं असून त्यांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. 

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी इमारतीच्या पायऱ्यांवरील एका सीसीटीव्हीत कैद झाला होता. याशिवाय वांद्रे रेल्वे स्थानकाच्या ब्रीजवरुन उतरताना देखील आरोपी सीसीटीव्हीत दिसला होता. 

इतर बातम्या :

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! पोलिसांच्या हाती मोठा पुरावा; आरोपीच्या मुसक्या कधी आवळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खाजगी वॉर्डात शिफ्ट करणारSSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरणPravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Embed widget