Sai Tamhankar : 'मी स्थिरावणारी व्यक्ती नाही, पण पुढच्या 6-7 महिन्यांत...', ब्रेकअपच्या चर्चांनंतर सईच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
Sai Tamhankar : सई ताम्हणकरने तिच्या ब्रेकअपच्या चर्चांनंतर केलेल्या वक्तव्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आली आहे. अनेक महिन्यांपासून सईचं नाव हे निर्माता अनिष जोग याच्यासोबत जोडलं जात होतं. इतकच नव्हे तर त्यांच्या अनेक मित्र मैत्रिणींच्या सोहळ्यात ते दोघे एकत्र सहभागी होत होते. पण काही दिवसांपूर्वी सईने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
सईने काही दिवसांपूर्वी ती सिंगल आहे, अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तिच्या आयुष्यातील नात्याविषयी भाष्य केलं आहे. त्यामुळे सईचं सध्या खरंच सिंगल असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातच तिने केलेल्या वक्तव्याने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय.
मी स्थिरावणारी व्यक्ती नाही - सई ताम्हणकर
मुंबई तकच्या चावडीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये सईने या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तू भावनिकदृष्ट्या आणि नात्यांमध्ये स्थिरावण्याचा विचार केला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना सईने म्हटलं की,मी भावनिकदृष्ट्या स्थिरावण्याचा विचार केला आहे. पण मी स्थिरावणारी व्यक्ती आहे, असं मला वाटत नाही.कारण मी एका जागी शांत बसू नाही शकत, असा माझा स्वभाव आहे. त्यामुळे नात्यांमध्ये स्थिरावणं मी सहसा निवडणार नाही. पण भावनिकदृष्ट्या मला स्थिरावायला आवडेल. सध्या माझे याबाबत कोणतेही प्रयत्न सुरु नाहीत. पण असं वाटतंय की, सहा सात महिन्यानंतर करेन प्रयत्न सुरु.
'...म्हणून मी थांबलेय'
तुझ्यामते नात्यांमध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहे? यावर बोलताना सईने म्हटलं की, मला असं वाटतं की, नातं खूप गुंतागुंतीचं असतं. कारण त्याला खूप टप्पे असतात. नात्यामध्ये पारदर्शकता असणं खूप गरजेचं आहे. एकमेकांविषयी आदर असणंही मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्याचप्रमाणे योग्य प्रकारचं स्वातंत्र्य असणंही गरजेचं आहे. आर्थिक किंवा अगदी व्यक्ती म्हणूनही. मी अशी खूप रिलेशनशिप पाहिली आहेत, ज्यामध्ये एका पार्टनरने दुसऱ्या पार्टनरला विचारलं मला सोलो ट्रीपला जायचं, तर दुसरी व्यक्ती विचारते का? अशी का वाली व्यक्ती मला नकोय म्हणून मी थांबले आहे, असं मला वाटतंय.