एक्स्प्लोर

Sachin And Supriya Pilgaonkar : एकाच दिवशी वाढदिवस साजरा करणारी मनोरंजन विश्वातील सुपरहिट जोडी! वाचा सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याबद्दल...

Happy Birthday Sachin And Supriya Pilgaonkar : मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी जोडी अर्थात अभिनेते सचिन आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा आज (17 ऑगस्ट) वाढदिवस आहे.

Happy Birthday Sachin And Supriya Pilgaonkar : मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी जोडी अर्थात अभिनेते सचिन (Sachin Pilgaonkar) आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचा आज (17 ऑगस्ट) वाढदिवस आहे. विशेष म्हणजे दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. या जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणाऱ्या या जोडीची प्रेमकथाही अशीच खास आहे. एका मराठी चित्रपटाच्या सेटवर या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली होती.

लहानपणापासून सचिन पिळगावकर यांना अभिनय क्षेत्रात यायचे होते. सचिन यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 'हा माझा मार्ग एकला' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ते बालकलाकाराच्या भूमिकेत झळकले होते. यानंतर त्यांनी ‘गीत गाता चल’, ‘बालिका वधू’, ‘नदियों के पार’ अशा अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पडली. दरम्यान, ते मराठी चित्रपट सृष्टीदेखील गाजवत होते. त्यांनी ‘माय बाप’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले.

‘नवरी मिळे नवऱ्याला’मधून सुरु झाली प्रेमकहाणी

अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा प्रचंड गाजला. या चित्रपटात त्यांनी सुप्रिया यांना मुख्य भूमिकेसाठी निवडले होते. त्यावेळी सुप्रिया या नवोदित अभिनेत्री होती. मात्र, या चित्रपटातून त्या घराघरांत पोहोचल्या. या चित्रपटाच्या सेटवरच सचिन यांना सुप्रिया आवडू लागल्या होत्या. दोघांच्या वयात तब्बल 10 वर्षांचा मोठा फरक होता. त्यावेळी सचिन यांनी आपल्या मनातील गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्यावर आईने देखील त्यांना होकार दिला होता.

अखेर प्रपोज केलाच!

सचिन पिळगावकर यांच्या आईने या नात्याला होकार दिला होता. मात्र, अजून सचिन यांनी आपल्या मनातील ही गोष्ट सुप्रिया यांना बोलून दाखवली नव्हती. चित्रपटाच्या दरम्यान प्रपोज करावा, असा विचार त्यांच्या मनात सुरु होता. मात्र, तसं काही झालं नाही. चित्रपटाच्या शूट दरम्यान प्रपोज राहून गेला. त्यांनी चित्रपट संपल्यावर सुप्रिया यांना आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.

सुप्रिया यांना सचिन आवडले होते. मात्र, त्यांचं आधीच लग्न झालं आहे, असा सुप्रिया यांचा समाज होता. अखेर आपले आधी लग्न झालेले नाही, हे सचिन पिळगावकर यांना पटवून द्यावे लागले. यानंतर 1 डिसेंबर 1985मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. या जोडीने ‘अशी ही बनवा बनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरत घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपूते’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 17 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Chatur Chor : 'चतुर चोर' चित्रपटात झळकणार अक्षया-हार्दिकची जोडी, लंडनमध्ये पार पडलं चित्रीकरण!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Embed widget