एक्स्प्लोर

Roop Nagar Ke Cheetey : एका मैत्रीची अनोखी गोष्ट, ‘रूप नगर के चीते’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Roop Nagar Ke Cheetey : एका मैत्रीची अनोखी गोष्ट ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

Roop Nagar Ke Cheetey : कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे ‘मैत्री’. रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात. मैत्री ... ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट एका मराठी चित्रपटातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नाव आहे ... 'रूप नगर के चीते'! (Roop Nagar Ke Cheetey)  नाव जरी हिंदी असलं, तरी चित्रपट मात्र मराठी आहे. येत्या 16 सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' आपल्या भेटीला येतील.

त्यापूर्वी या चित्रपटाचं एक धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. चिखलात माखलेले, कशाचीही पर्वा न करता, आपल्याच मस्तीत असलेले दोन जिगरी दोस्त आपल्याला त्यात दिसताहेत. ते कोण आहेत? त्याची ओळख लवकरच होणार आहे. एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली बॉलीवूड मधील संगीतकार मनन शाह यांनी 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून, अतिशय भव्य दिव्य पद्धतीने दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी हा चित्रपट साकारला आहे.

पाहा पोस्टर :

काय आहे कथानक?

सध्याच्या जगात मैत्रीची व्याख्या जरी तीच असली तरी तीचं स्वरुप बदलताना दिसतंय. या चित्रपटातूनही मैत्रीमधला वेगळा विचार आपल्या समोर येणार आहे. दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत. चित्रपटातील कलाकार आणि इतर तपशीलांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह यांनी एस एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या 'स्कूल, कॅालेज आणि लाईफ' या आगामी पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे विहान सूर्यवंशी हे 'रूप नगर के चीते'चं दिग्दर्शन करत आहेत.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Divorce: लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
Aamir - Gauri Wedding: आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
Aamir Khan Marries Gauri Spratt: आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
Rupali Chakankar on Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget