एक्स्प्लोर

Riteish Deshmukh Birthday : वडील मुख्यमंत्री होते तरी पहिला सिनेमा मिळवणं रितेशसाठी सोपं नव्हतं!

Riteish Deshmukh Birthday :  बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) चा आज वाढदिवस आहे. पहिला सिनेमा रितेशला कसा मिळाला याची स्टोरी त्यानं माझा कट्टा कार्यक्रमात सांगितली होती. 

Riteish Deshmukh Birthday :  बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) चा आज वाढदिवस आहे. रितेश आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza)ही जोडी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दोघांमधील प्रेम त्यानंतर लग्न आणि आतापर्यंतचा प्रवास जबरदस्त आहे. मात्र या दोघांना ज्या सिनेमानं आयुष्यभरासाठी एकत्र आणलं तो सिनेमा म्हणजे तुझे मेरी कसम. हा सिनेमा रितेशला कसा मिळाला याची स्टोरी त्यानं माझा कट्टा कार्यक्रमात सांगितली होती. 

रितेशनं सांगितलं होतं की,  तुझे मेरी कसम हा सिनेमा माझ्या आधी जिनिलियाला मिळाला. हा सिनेमा दुसरा अभिनेता करणार होता. तो अभिनेता त्यावेळी दुसरा सिनेमा करत होता. त्यावेळी त्या अभिनेत्याला एका सिनेमाची निवड करायला सांगितलं गेलं. त्यावेळी त्यानं दुसरा चित्रपट निवडला. मग या सिनेमासाठी निर्मात्यांना जिनिलियासोबत एक फ्रेश चेहरा हवा होता. मी एकदा सुभाष घई यांच्या सेटवर गेलो होतो. कारण मला फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटवर प्रोजेक्ट बनवायचा होतो. मला स्टुडिओ वगेरे काही माहिती नव्हतं. त्या कामासाठी गेलो असता तिथल्या डीओपीला वाटलं मी चित्रपटात अॅक्टिंग करायला आलो आहे. या घटनेच्या दीड वर्षानंतर मला फोन आला की, असा एक सिनेमा आहे त्यात काम कराल का? त्यावेळीही मी बघू असं सांगितलं. मला वाटलं आपल्या पुढच्या पीढीला सांगता येईल की, आपल्याला चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी डन असं सांगितलं. मग मीच त्यांना म्हणालो जरा थांबा, मला घरी याबाबत बोलावं लागेल. मला जाणिव होती की आपले वडील मुख्यमंत्री आहेत. आपण असंच निर्णय घेऊ शकत नाही. आईला सांगितल्यावर त्यांनी होकार दिला. 

रितेशनं सांगितलं होतं की, मी हैदराबादला लूक टेस्टला गेलो होतो.  मला सांगण्यात आलं की हिरोईन देखील त्याच विमानानं येणार आहे. आम्ही विमानातून उतरल्यानंतर प्रोडक्शनच्या एका व्यक्तिनं आमची ओळख करुन दिली. त्यावेळी मी जिनिलियाला HI केलं तर तिनं अॅटिट्यूड दाखवत Hello असं म्हटलं, असं रितेशनं सांगितलं. यावर जिनिलिया म्हणाली की, मी विचार केला की, मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. तो अॅटिट्यूड दाखवेल, त्याआधी मीच अॅटिट्यूड दाखवला.  रितेशनं सांगितलं की, दोन दिवसानंतर आम्ही शूटिंगच्या ठिकाणी भेटलो. तिथं जिनिलियानं तिथं असलेल्या झाडीकडे इशारा करत मला विचारलं की, त्या झाडीच्या पाठीमागे तुमचे बॉडिगार्ड आहेत का? पण मी सांगितलं की माझ्याकडे बॉडिगार्ड नाही. विलासराव देशमुख आठ वर्ष मुख्यमंत्री असताना मला एकदाही सेक्युरिटी नव्हती, असं रितेश म्हणाला. मी ही कधीच मागितली नाही, त्यानंतर जिनिलियाला वाटलं की आता आपण याच्याशी बोलू शकतो, असं त्यानं सांगितलं होतं.

यावेळी रितेश म्हणाला की, आपल्याला चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी डन असं सांगितलं. मग मीच त्यांना म्हणालो जरा थांबा, मला घरी याबाबत बोलावं लागेल. मला जाणीव होती की आपले वडील मुख्यमंत्री आहेत. आपण असंच निर्णय घेऊ शकत नाही. आईला सांगितल्यावर त्यांनी होकार दिला. मग मी बाबांना भेटायला गेलो. वर्षा बंगल्यावर त्यांना भेटलो आणि चित्रपट करणार असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले तू अॅक्टिंग करणार आहेस का? मी हो असं सांगितलं. त्यानंतर मी त्यांना म्हटलं की, सिनेमा चालला नाही तर लोकं विलासरावांच्या मुलाचा सिनेमा चालला नाही असं म्हणत तुमच्यावर टीका होईल. माझी काही ओळख नाही, तुमची ओळख आहे. त्यावर ते (विलासराव देशमुख) की, तू तुझ्या नावाची काळजी घे मी माझ्या नावाची काळजी घेईल. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी, असं रितेशनं सांगितलं. त्यानंतर ही फिल्म फायनल झाली, असं रितेशनं सांगितलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जिनिलियासोबत भांडणं झाल्यानंतर रितेशची भन्नाट ट्रिक, माझा कट्ट्यावर सांगितलं गुपित 

'तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची काळजी घेईन' विलासरावांचा तो सल्ला अन् रितेशचं आयुष्य बदललं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Embed widget