गोंडस पिल्लांसोबतचा खास व्हिडीओ शेअर करताना रिंकू राजगुरुकडून इंग्लिश कॅप्शन, नेटकऱ्यांच्या कमेंट्सने लक्ष वेधलं
Rinku Rajguru Video : अभिनेत्री रिंकू राजगुरुचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

Rinku Rajguru Video : अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru Video) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी रिंकू नेहमी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने तिच्या पेट सोबतचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये रिंकू राजगुरु (Rinku Rajguru Video) कुत्र्यांच्या गोंडस पिल्ल्यांसोबत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला हजारो लाईक आले आहेत. शिवाय रिंकू राजगुरुने या व्हिडीओला इंग्रजीत कॅप्शन दिलंय. त्यामुळे नेटकऱ्यांनी देखील कमेंट्सचा पाऊस पाडलाय. "इंग्लिशचा क्लास लावलाय का?" अशा कमेंट्स रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru Video) या व्हिडीओवर आल्या आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री रिंकू राजगुरुचा बेटर हाल्फची लव्हस्टोरी हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे आणि रिंकू राजगुरु मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. या सिनेमात अजयच्या आयुष्यात अचानक वळण येतं. जेव्हा त्याला प्रेमात दुसरी संधी मिळते, पण त्यात असा ट्विस्ट असतो, ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. "Better Half ची Love Story" ही एक हृदयस्पर्शी मराठी रोमँटिक स्टोरी आहे.
दरम्यान, अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला खरी ओळख मिळाली ती सैराट या सिनेमामुळेच... सैराटमधील आर्ची म्हणून रिंकू राजगुरु घराघरात पोहोचली. या सिनेमाला मिळालं तेवढं यश रिंकूच्या इतर सिनेमांना मिळालं नाही. सैराटनंतर रिंकू राजगुरुने कागर हा राजकारणावर आधारीत सिनेमा केला. त्यानंतर मेकअप, आठवा रंग प्रेमाचा, झुंड अशा अनेक सिनेमांमध्ये रिंकू झळकलेली पाहायला मिळाली. या शिवाय रिंकू राजगुरुने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. रिंकू राजगुरु हिने Hundred या नेटफ्लिक्सवरील वेबसिरीजमध्ये देखील काम केलेलं पाहायला मिळालं. याशिवाय तिचे अनेक सिनेमा सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























